Mathadi Worker Accidental Death | मृत माथाडी कामगाराच्या कुटुंबाला मदत

Mathadi Worker Accidental Death | या कामगाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी यासाठी भाजप कामगार मोर्चाने पाठपुरावा केला होता.
Mathadi Worker Accidental Death
Mathadi Worker Accidental Death
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड येथील शासकीय धान्य गोदामात काम करत असताना रासायनिक पावडरमुळे पाय घसरून गंभीर जखमी झालेल्या माथाडी कामगार अनिरुद्ध कारभारी बर्वे (४५) यांचे उपचारादरम्यान निधन झाले होते. या कामगाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी यासाठी भाजप कामगार मोर्चाने पाठपुरावा केला होता.

Mathadi Worker Accidental Death
PF News Nashik | 'नासाका' कामगारांचे 3.84 कोटी पीएफ खात्यात जमा

अखेर शिवराज्याभिषेकदिनी संबंधित ठेकेदाराकडून मृत कामगाराच्या कुटुंबाला एक लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली असून, याबाबतचा धनादेश सदर कामगाराच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला आहे. रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष महेश सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण रेशन दुकानदार संघटनेच्या वतीने प्रत्येक दुकानातून ५०० रुपयांची वर्गणी गोळा करण्यात आली.

यातून जमा झालेला ३२ हजार ५०० रुपयांचा मदतनिधीही बर्वे यांच्या कुटुंबीयांना धनादेशाद्वारे देण्यात आला. भाजप कामगार मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस व्यंकटेश मोरे आणि शहराध्यक्ष हेमंत नेहेते यांनी मदतीसाठी प्रयत्न केले. तसेच जोपर्यंत मृत कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. दरम्यान, मृत कामगाराच्या कुटुंबीयांना मदत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

Mathadi Worker Accidental Death
Bhayandar Construction Worker Accident: इमारतीवरून पडून 19 वर्षीय कामगाराचा मृत्यू

कामगारांना सुरक्षा साहित्य द्या !

गोदामातील कामगारांनी अँटी स्लिप सुरक्षा बूट, हेल्मेट आणि इतर आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून दिले जात नसल्याची तक्रार मांडली. यावर भाजप कामगार मोर्चाचे पदाधिकारी व्यंकटेश मोरे आणि हेमंत नेहेते यांनी कामगारांना आश्वस्त करत त्यांच्या सर्व समस्या टप्प्याटप्प्याने सोडविण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराबाबत विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी आणि धान्य वितरण अधिकारी यांच्याकडे निवेदने देण्यात आली असून, कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news