Nashik Road Bitco Hospital | बिटको रुग्णालयातील कोट्यवधींची यंत्रसामग्री धूळ खात! 150 कोटींच्या रुग्णालयाचा कारभार रामभरोसे?

Nashik Road Bitco Hospital | बिटकोत वैद्यकीय सुविधा तीन वर्षांपासून वापराविना पडून, गरीब रुग्ण सेवेपासून वंचित
Nashik Road Bitco Hospital
Nashik Road Bitco Hospital
Published on
Updated on

नाशिकरोड : प्रफुल्ल पवार

येथील बिटको रुग्णालयात कोट्यवधी रुपयांची आधुनिक वैद्यकीय यंत्रणा मागील तीन वर्षांपासून वापराविना धूळ खात पड़न असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेली मॉलिक्युलर लॅब तसेच अत्याधुनिक व्हेंटिलेटर यंत्रणा आणि रक्तपेढी सध्या बंद अवस्थेत असून, याबाबत अस्वच्छता हे मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Nashik Road Bitco Hospital
Goa GI Tag | गोव्याच्या 'पावपोळी'ला मिळणार जागतिक ओळख! जीआय मानांकनासाठी 3 नवीन प्रस्ताव सादर

कोरोना काळात नवीन संसर्गजन्य आजारांचे निदान करण्यासाठी मोठ्या खर्चातून मॉलिक्युलर लॅब उभारण्यात आली होती. त्या काळात या लॅबचा वापर मोठ्या प्रमाणात झाला; मात्र कोरोना संसर्ग ओसरल्यानंतर ही लॅब बंद पडली. त्यानंतर कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री आणि व्हेंटिलेटर खाटादेखील निष्क्रिय अवस्थेत पडून आहे.

सरकारने सुमारे १५० कोटी रुपये खर्चुन उभारलेल्या या भव्य रुग्णालयाचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रुग्णालय असे नामकरण करण्यात आले. या रुग्णालयात सुसज्ज रक्तपेढी उभारण्यात आली असली, तरी ती अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेली नाही. सध्या जुने बिटको रुग्णालयातच रक्तपेढी कार्यरत असून, दरमहा सुमारे ७०० ते ८०० लिटर रक्ताचा पुरवठा रुग्णांना केला जातो.

Nashik Road Bitco Hospital
Nashik Crime Branch | फाइल्स गहाळ प्रकरण तपासासाठी युनिट 1 कडे

नव्या रक्तपेढीत रक्त विलगीकरणाची आधुनिक व्यवस्था उपलब्ध असतानाही ती सुरू करण्यात उशीर का होत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात सुविधा सुरू होत नसल्यामुळे केवळ श्रेयवादामुळेच कामे रखडली आहेत का, अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत. शहरातील हे सरकारी पातळीवरील सर्वात मोठे रुग्णालय असले, तरी काही विभाग अद्याप पूर्णपणे कार्यरत नाहीत.

अनेक रुग्णांना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालय किंवा वसंतराव पवार मेडिकल हॉस्पिटल येथे हलवावे लागते. रुग्णालय परिसरातील स्वच्छतेबाबतही गंभीर तक्रारी समोर येत आहेत. एमआरआय विभागासमोर ड्रेनेज तुंबल्याने डास व मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती असतानाही अशी परिस्थिती का निर्माण झाली, असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत.

Nashik Road Bitco Hospital
Mandavi River Casinos | मांडवीत सातव्या 'कॅसिनो'ची एन्ट्री! पणजी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नवा वाद पेटला

रक्तपेढीचे काम पूर्ण झाले असून, परवान्यासाठी काम रखडले होते. आता प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या महिन्याअखेर रक्तपेढी सुरू होईल. पहिले होल ब्लड घेतले जायचे. आता या रक्तपेढीत कॉम्पोनंट सेपरेशन घेतले जाणार आहे.

डॉ. शिल्पा काळे, वैद्यकीय अधिकारी

मॉलिक्युलर लॅब ही रक्ताच्या विशेष चाचण्यांसाठी वापरली जाते. सध्या ही लंब सुरू करण्यासाठी परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. परवानगी मिळताच तेथे डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांच्या चाचण्या सुरू होतील.

डॉ. जितेंद्र धनेश्वर, सहायक वैद्यकीय अधिकारी

गेल्या तीन वर्षांपासून कोट्यवधी रुपयांच्या वस्तू ह्या रुग्णालयात धूळ खात पडून आहेत. त्याला वाली कोणीच नाही, तरी प्रशासनाने लवकरात लवकर रक्तपेढी व मॉलिक्युलर लॅब सुरू करावी व रुग्णांना सुविधा द्याव्यात.

श्याम गोहाड, युवान प्रतिष्ठान अध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news