Nashik Bribe | नाशिक जि.प.तील उपअभियंता पठाडे ३ लाखांची लाच स्वीकारताना अटक!

शाखा अभियंता कृष्णकांत देवरे कारवाईदरम्यान फरार, भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Nashik Bribe
Nashik Bribe
Published on
Updated on

नाशिक, चांदवड : जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता विठ्ठल बालाजी पठाडे यांना तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले असून, या प्रकरणातील दुसरे आरोपी शाखा अभियंता कृष्णकांत जिभाऊ देवरे हे फरार झाले आहेत. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तक्रारदार हे चांदवड तालुक्यातील कंत्राटदार असून त्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागात आपली फर्म नोंदणीकृत केली आहे. संबंधित रस्ता डांबरीकरणाच्या सुमारे ९० लाख रुपयांच्या कामासाठी त्यांनी निविदा मिळवली होती. या कामाच्या बिलांपैकी सुमारे ४१ लाख रुपये मिळाले असून उर्वरित सुमारे १० लाखांचे बिल मंजुरीसाठी प्रलंबित होते. मात्र, हे बिल मंजूर करून देण्यासाठी उपअभियंता पठाडे यांनी तीन लाख, तर शाखा अभियंता देवरे यांनी २ लाख ६७ हजार रुपये अशी एकूण ५ लाख ६७ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत ३० मार्च रोजी एसीबीकडे धाव घेतली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यानुसार, पठाडे यांनी जिल्हा परिषद कार्यालयात ३ लाख रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना सायंकाळी सुमारे ४.४५ वाजता पंचासमक्ष रंगेहात अटक करण्यात आली. या रकमेतील काही नोटा ‘डमी’ स्वरूपात असल्याचेही स्पष्ट झाले. दरम्यान, सहआरोपी देवरे यांनी त्यांच्या वाट्याची रक्कम स्वीकारण्यास मान्यता दिली होती, मात्र कारवाईदरम्यान ते फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुरेश शिरसाठ व पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या पथकाने केली. या प्रकरणामुळे बांधकाम विभागातील कामकाजावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news