Nashik ZP CEO Omkar Pawar Meeting | सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे

Nashik ZP CEO Omkar Pawar Meeting |सीईओ ओमकार पवार : आषाढीवारीसोहळा नियोजन बैठक
नाशिक
सीईओ ओमकार पवार(छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकरी बांधव व भाविकांना स्वच्छ, सुरक्षित व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, अशा सूचना जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिल्या. यावेळी पवार यांनी पालखी मार्गावरील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृहे, कचरा व्यवस्थापन आणि आरोग्य सुविधांबाबत सविस्तर आढावा घेतला.

नाशिक
Wari @2026 | आषाढी वारीसाठी सर्वोत्तम सुविधा द्या; वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

जिल्हा परिषदेमध्ये गुरुवारी (दि. २५) संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज आषाढी पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता विभाग) दीपक पाटील, निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वरचे अध्यक्ष राहुल साळुंके, पालखी सोहळाप्रमुख मनोजकुमार राठी, निर्मलवारीचे प्रतिनिधी सुजित जाजू, बांधकामचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र महाजन, नाशिक पंचायत समिती गट विकास अधिकारी डॉ. सोनिया नाकाडे, त्र्यंबकेश्वर पंचायत समिती गट विकास अधिकारी रविकांत सानप,

अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षाचे डॉ. चैतन्य बैरागी, नाशिक महानगरपालिका, त्र्यंबकेश्वर नगर परिषद, सिन्नर नगर परिषद प्रतिनिधी यांच्यासह पालखी मार्गातील ग्रामपंचायतीतील सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आदी उपस्थित होते. बैठकीत उपस्थित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागामार्फत करण्यात येणाऱ्या तयारीची माहिती दिली. पालखी सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

नाशिक
Ashadhi Ekadashi : पालखी मार्गावर यंदा पाचशे स्‍नानगृह

ओमकार पवार यांनी बैठकीत दिलेल्या सूचना

पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. निर्मलवारी उपक्रम प्रभावीपणे राबवून पालखी मार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी. पिण्याच्या पाण्याचा नियमित व शुद्ध पुरवठा,

तात्पुरत्या स्वच्छतागृहांची उभारणी, कचरा संकलन व विल्हेवाट याबाबत नियोजनबद्ध कार्यवाही करावी. पालखी मार्गात होणारे अतिक्रमण व नाशिक पंचायत समितीसमोरील रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे. आरोग्य विभागाने आवश्यक औषधसाठा, वैद्यकीय पथके व आपत्कालीन आरोग्यसेवा सज्ज ठेवाव्यात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news