Nashik ZP Mission | बांधकाम विभाग स्थलांतरासाठी 31 मे ची डेडलाइन

Nashik ZP Mission | जिल्हा परिषदेचे 'मिशन स्थलांतर'; कृषी, लघुपाटबंधारे आजपासून नवीन इमारतीत
Nashik ZP Election
Zilla Parishad Nashik / जिल्हा परिषद नाशिकPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषद प्रशासनाने 'मिशन स्थलांतर' हाती घेतले आहे. जुन्या इमारतीतील उर्वरित विभाग स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाने संबंधित विभागांना ३१ मे डेडलाइन दिली आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार सोमवार (दि. २५) पासून कृषी आणि लघुपाटबंधारे विभागाचे कामकाज नवीन प्रशासकीय इमारतीतून सुरू होईल.

Nashik ZP Election
Goa Cancer Hospital | नवीन कर्करोग रुग्णालयामुळे 500 नोकऱ्यांची निर्मिती : मंत्री राणे

जुन्या इमारतीचे सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाकडून भाडेनिश्चिती झाल्यानंतर इमारतीतील विभाग हटविण्याबाबत त्यांच्याकडून तगादा सुरू झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने स्थलांतरासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. त्र्यंबक रोडवरील एबीबी सर्कल येथे जिल्हा परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत उभी राहिली आहे. नोव्हेंबर महिन्यात अनेक विभागांचे स्थलांतर झाले असले, तरी बांधकाम, लघुपाटबंधारे, कृषी आणि माध्यमिक शिक्षण विभाग अद्यापही जुन्याच इमारतीत कार्यरत आहेत.

मात्र, गेल्या महिन्यात जुन्या इमारतीत तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या लाचखोरीमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. जुन्या इमारतीतील विभागांवर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याची चर्चा असल्यामुळे हे सर्व विभाग तातडीने नवीन प्रशासकीय इमारतीत नेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रशासनाने नवीन प्रशासकीय इमारतीतील बांधकाम काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.

Nashik ZP Election
Mapusa Fish Market | म्हापसा मासळी मार्केटची दुरवस्था; गोवा कॅनकडून चिंता

या पाठोपाठ आता प्रशासनाने प्रत्यक्ष स्थलांतर मिशन हाती घेतले आहे. सिंहस्थ प्राधिकरणाने जुन्या इमारतीचे १८ लाख ५० हजार रुपये भाडे निश्चित केले आहे. प्राधिकरणाने या विभागांच्या स्थलांतरासाठी आग्रह सुरू केला आहे. त्यानुसार, कृषी आणि लघुपाटबंधारे विभागाचे सोमवारी (दि. २५) स्थलांतर होणार आहे. उर्वरित बांधकाम १, २, ३ तसेच माध्यमिक विभागांनाही ३१ मेपर्यंत स्थलांतरित होण्यासाठी मुदत दिली आहे. स्थलांतर करावयाचे असल्यामुळे नवीन प्रशासकीय इमारतीत कामांना वेग आला आहे. कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी फर्निचरच्या कामाचा आढावा घेतला. पावसाळा सुरू होण्यापूर्वी, नवीन प्रशासकीय इमारतीतून सर्व विभागांचे कामकाज सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

नवीन प्रशासकीय इमारतीतील वरच्या तीन मजल्यांची कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. कृषी, लघुपाटबंधारे विभागांचे स्थलांतर होत असून, उर्वरित विभाग ३१ मेपर्यंत स्थलांतरित करण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्व विभागांचे कामकाज जूनपासून नवीन प्रशासकीय इमारतीतून सुरू होईल.

-प्रतिभा संगमनेरे, प्रभारी सीईओ, जि.प. नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news