

सिन्नर (नाशिक) : नाशिक जिल्हा परिषदेच्या गट व गणांची प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार तालुक्यात 2017 प्रमाणाचे सहा गट व बारा गण राहणार आहेत. गट-गणरचना पूर्वीप्रमाणेच राहिल्याने इच्छुकांचा जीव भांड्यात पडला आहे.
मध्यंतरी ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी करण्यात आली होती. त्यावेळी मात्र एक गट आणि दोन गण वाढविण्यात आले होते. त्यावेळी गट आणि गणांच्या रचनेत मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत होते. त्यामुळे अनेक इच्छुकांची झोप उडाली होती. तथापि, पूर्वीप्रमाणेच गट-गणरचना राहिल्याने इच्छुकांना दिलासा मिळाला आहे. 21 जुलैपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
नायगाव गण - चिंचोली, जामगाव, जायगाव, जोगलटेंभी, नायगाव, पास्ते, ब्राह्मणवाडे, मोह, मोहदरी, वडगाव पिंगळा, सोनगिरी. माळेगाव गण - के.पा.नगर, देशवंडी, निमगाव- सिन्नर, पाटपिंप्री, बारागावपिंप्री, माळेगाव, मापरवाडी, वडझिरे, सरदवाडी, सुळेवाडी (सुंदरपूर).
मुसळगाव गण : आट कवडे, भाटवाडी, मनेगाव, मुसळगाव, गुरेवाडी, कुंदेवाडी, वडगाव सिन्नर, शास्त्रीनगर, हरसुले. गुळवंच गण - कीर्तांगळी, एकलहरे, कोलवाडी, खोपडी बुद्रुक, खोपडी खुर्द, गुळवंच, चोंढी, दातली, शहापूर, केदारपूर, फर्दापूर, भोकणी, वडांगळी, हिवरगाव.
सोमठाणे गण - खडांगळी, दहिवाडी, महाजनपूर, देवपूर, धारणगाव, निमगाव देवपूर, पंचाळे, पिंपळगाव, मेंढी, श्रीरामपूर, सांगवी, सोठाणे. शहा गण : उजनी, कारवाडी, कोळगावमाळ, पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, भरतपूर, लक्ष्मणपूर, मिठसागरे, मिरगाव, रामपूर, वारेगाव, शहा.
पांगरी बुद्रुक गणक हांडळवाडी, घोटेवाडी (आशापूरी), दुशिंगवाडी, पांगरी बु, पांगरी खुर्द, फुलेनगर, मलढोण, मर्हळ खुर्द, मर्हळ बुद्रुक, यशवंतनगर (पिंपरवाडी), वावी, सायाळे, सुरेगाव. नांदूरशिंगोटे गण : कणकोरी, दोडी खुर्द, दोडी बुद्रुक, नांदूरशिंगोटे, निर्हाळे, फत्तेपूर, मानोरी.
दापूर गण - कासारवाडी, खंबाळे, गोंदे, चास, दत्तनगर, दापूर, नळवाडी, शिवाजीनगर. डुबेरे गण : चापडगाव, डुबेरे, डुबेरेवाडी (कृष्णनगर), धुळवाड, धोंडवीरनगर, पाटोळे, पिंपळे, रामनगर (रामोशीवाडी), सोनेवाडी, हिवरे.
ठाणगाव गण : आडवाडी, कोनांबे, चंद्रपूर, खापराळे, टेंभुरवाडी (आशापूर), ठाणगाव, पाडळी, सोनांबे, सोनारी, जयप्रकाशनगर. शिवडे गण : आगासखिंड, औंढेवाडी, घोरवड, धोंडबार, पांढुर्ली, बेलू, बोरखिंड, विंचुरीदळवी, शिवडे, सावतामाळीनगर.