Nashik ZP Primary School | जि. प.चा 'सीबीएसई पॅटर्न' उपक्रम अखेर रद्द

Nashik ZP Primary School | जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या धर्तीवर दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेला 'सीबीएसई पॅटर्न' उपक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे.
ठाणे
सीबीएसई पॅटर्न राज्यातील शाळांमध्ये लागू Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या धर्तीवर दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेला 'सीबीएसई पॅटर्न' उपक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येच 'स्टेट बोर्ड' आणि 'सीबीएसई' असा अंतर्गत भेद निर्माण होण्याची शक्यता आणि राज्य बोर्डाच्या बदललेल्या अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी विचारात घेऊन शिक्षण विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

ठाणे
Campus to Career: ‘पुढारी कॅम्पस टू करिअर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; एआय, रोबोटिक्स आणि करिअर संधींबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

जिल्हा परिषदेच्या एकूण ४ हजार २३८ शाळांमध्ये सध्या ४ लाख ६६ हजार विद्यार्थी राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण घेत आहेत. सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून प्रत्येक तालुक्यातील २ ते ३ शाळांची नावेही मागवण्यात आली होती.

ही निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली असतानाच प्रशासनाने अचानक हा उपक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाला चालना देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी शिक्षण मंडळाने अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करत एनसीईआरटीच्या धर्तीवर आपला अभ्यासक्रम तयार केला.

आपल्या परिणामी, स्टेट बोर्ड आणि सीबीएसई यांच्यातील अभ्यासक्रमाचे अंतर कमी झाले आहे. विद्यार्थ्यांना काठिण्य पातळी अधिक असलेला अभ्यासक्रम शिकायला मिळत असेल तर सीबीएसईचा पॅटर्न राबवून काय साध्य होणार, असा प्रश्न उपस्थित झाला.

तसेच विद्यार्थ्यांमधेही स्टेट बोर्ड व सीबीएसई शाळा भेदभाव निर्माण होऊ शकतो, असाही अंदाज वर्तविण्यात आला. आपल्या शाळांमध्ये भेदाभेद निर्माण करण्याऐवजी हा उपक्रम रद्द करणे शिक्षण विभागाला संयुक्तिक वाटले. त्यामुळे जिल्हा परिषदेने आपला सीबीएसई पॅटर्न रद्द केल्याचे बोलले जात आहे.

ठाणे
Campus To Career: बारामतीत ‘कॅम्पस टू करिअर’ कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

हा होता उपक्रम

जिल्हा परिषदेचे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी सीबीएसई पॅटर्न राबविण्याचा विचार मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी मांडला होता. त्यासाठी जिल्ह्यातील शाळांची निवड करून त्यांना विशेष सुविधा पुरविल्या जातील. जेणेकरून विद्यार्थ्यांना सीबीएसई अभ्यासक्रमाची गोडी निर्माण होईल, यादृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येणार होता.

सीबीएसई अभ्यासक्रम एनसीईआरटी मार्फत ठरविला जातो. स्टेट बोर्डानेही आपल्या अभ्यासक्रमात बदल करून त्याची काठिण्य पातळी वाढविली आहे. त्यामुळे आता सीबीएसई व स्टेट बोर्डाच्या अभ्यासक्रमात फार कमी फरक दिसून येतो. या पॅटर्ननुसार शाळा निर्मितीचा हेतू साध्य झाल्यामुळे आता हा उपक्रम थांबविला आहे.

साईलता सामलेटी (शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news