

येवला (नाशिक) : येथील पालिकेच्या सभागृहात बुधवारी (दि.८) सकाळी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. स्वामी मुक्तानंद विद्यालयातील विद्यार्थी प्रणव अवनकार, उत्कर्षा पोळ यांनी काढल्या. पालिकेच्या २६ पैकी १३ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या, तर सर्वसाधारण प्रवर्गाला १६ व नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सात जागा आरक्षित करण्यात आल्या. अनुसूचित जाती-जमातीसाठी तीन जागा निश्चित झाल्या.
प्रभागनिहाय आरक्षण असे....
प्रभाग १ : (अ) नामाप्रवर्ग, (ब) सर्वसाधारण महिला
प्रभाग २ : (अ) नामाप्रवर्ग महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग ३ : (अ) नामाप्रवर्ग महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग ४ : (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग ५ : (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग ६ : (अ) अनुसूचित जाती, (ब) सर्वसाधारण महिला
प्रभाग ७ : (अ) नामाप्रवर्ग, (ब) सर्वसाधारण महिला
प्रभाग ८ : (अ) नामाप्रवर्ग महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग ९ : (अ) नामाप्रवर्ग, (ब) सर्वसाधारण महिला
प्रभाग १० : (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग ११ : (अ) नामाप्रवर्ग महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग १२ : (अ) अनुसूचित जाती महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग १३ : (अ) अनुसूचित जमाती, (ब) सर्वसाधारण महिला