Nashik Diwali Shopping | नाशिकमध्ये दिवाळीपूर्वीच्या रविवारी उसळला खरेदीचा महापूर; शंभर कोटी रुपयांच्या उलाढालीचा 'सुपर संडे' ठरला साजरी

Nashik Diwali Shopping | कपडे, मिठाई, सजावटीच्या साहित्य्याची मोठी खरेदी
Diwali Shopping
Diwali ShoppingPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दिवाळीच्या स्वागतासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असताना नाशिकच्या मुख्य बाजारपेठेतसह उपनगरांमधील बाजारपेठांमध्ये रविवारी (दि. १) खरेदीचा अक्षरशः महापूर आला होता. सुटीचा दिवस, नोकरदार वर्गाच्या हातात आलेला बोनस आणि पुढील रविवारी साजरी होणारी दिवाळीचे वेध यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली होती.

Diwali Shopping
Nashik ZP to NASA | जिल्हा परिषदेच्या तीन शिक्षकांना मिळणार 'नासा' दौर्याची सुवर्णसंधी; 'नाशिक ते नासा' उपक्रमांतर्गत मोठी घोषणा

खरेदीचा प्रकार आणि अंदाजे उलाढाल

खरेदीचा प्रकार अंदाजे उलाढाल कपडे व कापड खरेदी३५ कोटी घरगुती सजावटीचे साहित्य१० कोटी आकाशकंदील व पणत्या५ कोटी विद्युत रोषणाई१५ कोटी मिठाई व गोड पदार्थ१५ कोटी फराळाचे साहित्य व तयार फराळ२० कोटी

एकूण अंदाजे१०० कोटी

बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली होती. विशेष मागणी होती. या प्रमुख वस्तूंच्या विक्रीतून शहरात सुमारे १०० कोटी रुपयांच्या उलाढालीचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे यंदाचा रविवार बाजारपेठांसाठी 'सुपर संडे' ठरला.

दिवाळी म्हटली की नवीन कपड़े, घरची सजावट आणि गोडधोड पदार्थांची खरेदी आलीच. यंदा नोकरदार वर्गाला बोनस मिळाल्याने खरेदीसाठी हात आखडता घेतला जात नसल्याचे चित्र दिसले. कुटुंबसह बाजारपेठेत दाखल झालेल्या नागरिकांनी कपड़े, साड्या, लहान मुलांचे पोशाख, रेडिमेड कपड़े आणि विविध फॅशनच्या वस्तूंची खरेदी केली. कपड्यांच्या दुकानांमध्ये दिवसभर ग्राहकांची वर्दळ सुरू होती.

Diwali Shopping
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागासाठी तब्बल 1618 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या भरतीला मिळणार मुहूर्त

घराला दिवाळीचा साज चढवण्यासाठीची नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. तोरण, रंगोल्या, आकर्षक सजावटीच्या वस्तू, पणत्या, समया, आकाशकंदील यांससह विविध प्रकारच्या वस्तूंना मागणी होती. घराबाहेर आणि बाल्कनीत लावण्यासाठी रंगीबेरंगी विद्युत माळा, एलईडी दिवे, आकर्षक प्रकाशयोजना आणि विविध आकारांतील रोषणाईच्या साहित्याची खरेदीही जोरात सुरू होती.

दिवाळीच्या फराळाची तयारी घरातघरात सुरू झाली असून, त्यासाठी लागणारे पोहे, रवा, मैदा, बेसन, तेल, साखर, सुकामेवा यांसह अन्य साहित्य खरेदीसाठी किराणा दुकानांमध्ये गर्दी झाली होती. दुसरीकडे घरगुती फराळ तयार करण्याची वेळ नसलेल्या नागरिकांनी तयार चकली, चिवडा, करंजी, लाडू, शंकरपाळे यांना पसंती दिली.

मिठाईच्या दुकानांमध्येही विविध प्रकारच्या मिठाई आणि आकर्षक भेटवस्तूंची खरेदी होत होती. शहरातील मेनरोड, शालीमार, रविवार कारंजा, रविवार पेठ, नाशिकरोड, कॉलेजरोड, गंगापूर रोड यांससह विविध व्यापारी संकुले आणि मॉल्समध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होती. अनेक ठिकाणी वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतुकीची वेगळी मंदावला होता. सणासुदीच्या खरेदीमुळे व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.