

नाशिक : आदिवासी भागात रोजंदारी/तासिका तत्त्वावरील शिक्षकांचा सन्मान आहेच, मात्र विद्यार्थ्यांचे अध्ययन आणि अध्यापन अधिक चांगल्या पद्धतीने होणे गरजेचे आहे. यासाठी आगामी काळात कंत्राटी शिक्षकांची भरती करण्यात येईल.
आगामी काळात कंत्राटी शिक्षकांची भरती करण्यात येईल. त्यासाठी आदिवासी संघटनांंनी केवळ विरोधासाठी विरोध करू नये, भावनिक आणि भावनाप्रधान होऊन विचार न करता विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याला प्राधान्य द्यावे, शासन त्यासाठी प्रयत्नशील असून, विद्यार्थ्यांचे भविष्य कदापीही बरबाद होऊ देणार नाही, अशी ग्वाही आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उइके यांनी दिली.
आदिवासी आश्रमशाळांचे शैक्षणिक सत्र सोमवार (दि. १६)पासून सुरू झाले. यानिमित्ताने प्रवेशोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. उईके यांनी माध्यमांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षक मिळणे हा त्यांचा हक्क आहे, यापुढे सर्व विषयांचे पात्र शिक्षकच विद्यार्थ्यांना शिकवतील. विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक सुरक्षित आणि उज्ज्वल व्हावे यासाठी आदिवासी कंत्राटी शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. मात्र, यास काही आदिवासी संघटनांचा विरोध होत आहे. जर कोणी यासाठी ब्लॅकमेल करत असेल तर शासन ते कदापीही सहन करणार नाही. चुकीच्या गोष्टींना आदिवासी संघटनांनी पाठिंबा देऊ नये, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या बिर्हाड मोर्चावर निशाणा साधला.