Nashik Weather Update | नाशिक थंड, निफाडचा पारा पुन्हा घसरला

द्राक्ष बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण
Nashik Cold Weather Update
नाशिक शहरात थंडी वाढल्याने, उबदार कपडे परिधान करून शेकोटीची उब घ्यावी लागत आहे. file
Published on
Updated on

नाशिक : गेल्या डिसेंबर महिन्यात हंगामातील निच्चांकी ५.६ अंश सेल्सियस तापमान नोंदविणाऱ्या निफाडचा पारा पुन्हा एकदा घसरला आहे. गुरुवारी निफाडचे तापमान ६.८ अंश सेल्सियस इतके नोंदविले गेल्याने निफाडमध्ये पुन्हा एकदा कडाक्याचे थंडी अनुभवयास मिळत आहे. तर शहरातही थंडी वाढल्याने, नाशिककरांना दिवसभर उबदार कपडे परिधान करून वावरावे लागत आहे.

यंदा उशिराने थंडी सुरू झाल्याने नोव्हेंबर महिन्यांच्या अखेरीस थंडीचा जोर दिसून आला. ३० नोव्हेंबर रोजी निफाडच्या किमान तापमानाची नोंद ७ अंश सेल्सिअस इतकी झाली होती. त्यानंतर १६ डिसेंबर रोजी हंगामातील सर्वाधिक ५.६ अंश सेल्सियस निच्चांकी तापमानाची नोंद निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहु संशोधन केंद्रात झाली होती. डिसेंबर महिन्यांच्या अखेरीस अन् जानेवारीच्या प्रारंभी थंडीचा जोर ओसरल्याचे दिसून आले. त्यातच अवकाळी पाऊस झाल्याने, थंडी गायब झाली होती. आता पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने जिल्ह्यात विशेषत: निफाड आणि ओझर परिसरात निच्चांकी तापमानाची नोंद होत आहे. शहरातही थंडीचा कडाका जाणवत आहे. चालू आठवड्याच्या सुरुवातीला ढगाळ वातावरणामुळे झोंबणाऱ्या थंडीचा प्रभाव अधिकच जाणवत होता. दरम्यान, गुरुवारी शहरात १० अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाल्याने, थंडी पुन्हा एकदा परतली आहे. दिवसभर थंडीचा प्रभाव दिसून येत असल्याने, नागरिकांना उबदार कपडे परिधान करून वावरावे लागते. याशिवाय सकाळच्या सुमारास थंडी अन् धुक्याचा मिलाप अनुभवयास मिळत असल्याने नाशिककर थंडीचा आनंद घेताना दिसून येत आहेत.

द्राक्ष बागांना फटका

थंडीचा जोर वाढल्याने, द्राक्ष बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या द्राक्ष फुगवणीचा काळ आहे. मात्र, थंडीमुळे द्राक्ष फुगवणी परिणाम होणार असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. द्राक्ष मण्यांना तडे जात असल्यानेही द्राक्ष बागायतदार शेतकरी चिंतेत आहेत. दुसरीकडे गहु, हरबरा या पिकांसाठी थंडी पोषक असल्याने, शेतकऱ्यांमध्ये कही खूशी कही गम असे वातावरण बघावयास मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news