

लासलगाव : यंदा मार्चपासूनच तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली असताना, हवामान बदलाचा वेगळाच परिणाम होताना दिसत आहे. निफाड तालुक्यात एेन मार्चमध्ये थंडी परतली असून, कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात ४.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातही जवळपास अशीच स्थिती असून, दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री थंडी असा अनुभव येत आहे.
वातावरणातील या बदलाचा फटका निफाड तालुक्याला बसला आहे. उन्ह - थंडीच्या खेळात नागरी आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. महाबळेश्वर आणि लोणावळ्यासारखे तापमान निफाड तालुक्यात घटले आहे. दुसरीकडे द्राक्षपंढरीत तापमानात मोठी घट झाल्याने द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत.
१ मार्च - १४.४
४ मार्च - १२.१
५ मार्च - ११.६
६ मार्च -४.२