

नाशिक : विजयादशमीच्या निमित्ताने शहरात विविध संस्थांमध्ये मान्यवरांच्या हस्ते शस्त्र पूजन करण्यात आले.
सावाना वस्तुसंग्रहालय सार्वजनिक वाचनालय नाशिक येथे वस्तुसंग्रहालयात शस्त्र पूजनाचा कार्यक्रम पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त सैनिक विजय सावळे, अभियंता योगेश कासार पाटील उपस्थित होते. कार्याध्यक्ष संजय करंजकर यांनी अध्यस्थान भूषवले. यावेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. वैद्य विक्रांत जाधव, सुरेश गायधनी, गिरीश नातू, जयेश बर्वे, मंगेश मालपाठक, प्रा. सोमनाथ मुठाळ, डॉ. अजय कापडणीस आदी यावेळी उपस्थित होते.
भोसला कॅम्पसमध्ये शस्त्रपूजन
भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये शस्त्र व अश्व पूजन महापालिका आयुक्त मनीषा खत्री जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. अविनाश भिडे, सरकार्यवाह हेमंत देशपांडे, कार्यवाह मिलिंद वैद्य, नाशिक विभागाचे अध्यक्ष संजय पगारे, डॉ. मनोहर शिंदे, आनंद देशपांडे, ॲड. सुयोग शहा नरेंद्र वाणी, आसावरी धर्माधिकारी आदी उपस्थित होते. मनिषा खत्री यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. सरकार्यवाह हेमंत देशपांडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्राचार्य डॉ. दिनेश नाईक, उपप्राचार्य आर. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला.
भोसला मिलिटरी स्कूलमध्ये शस्त्रपूजन
भोसला मिलिटरी स्कूलमध्ये जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते शस्त्रपूजन झाले. तत्पुर्वी त्यांनी संस्थापक धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. भोसला गर्ल्स स्कूलच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस आयुक्त संदीप कर्णीक होते. यावेळी ईएसडीसीचे अतिरिक्त संचालक आयुक्त जितेंद्र पाठक, चेतन चंडोले यांचेसह आसावरी धर्माधिकारी, डॉ. विनिता देशपांडे,आदिती भिडे, वसुधा कुलकर्णी आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी अश्वपूजन व शस्त्र पूजन केले. समादेशिका मेजर सपना शर्मा यांनी परिचय करून दिला. मुख्याध्यापिका वैशाली कुलकर्णी यांनी आभार मानले.