

नाशिक : मुकणे धरणावरील महापालिकेच्या पंपिंग स्टेशनचा विद्युतपुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार असल्यामुळे शनिवारी (दि.28) सकाळी 9 ते सायंकाळी 5 या दरम्यान मुकणे धरण थेट पाइपलाइनद्वारे होणारा सिडको, पाथर्डी, इंदिरानगर, वडाळा रोड तसेच नाशिक पूर्व विभागातील काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
महापालिकेने मुकणे धरण थेट पाइपलाइन योजनेअंतर्गत मुकणे धरणावर रॉ वॉटर पंपिंग स्टेशनची उभारणी केली आहे. या पंपिंग स्टेशनच्या माध्यमातून मुकणेतील पाणी उचलून विल्होळी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणले जाते. तेथे शुद्धीकरणाचा प्रक्रिया करून सिडकोसह नाशिक पूर्व विभागात पाणीपुरवठा केला जातो. मुकणे धरणावरील पंपिंग स्टेशनचा विद्युतपुरवठा गोंदे येथील रेमण्ड सबस्टेशन येथील एक्स्प्रेस फीडरवरून घेण्यात आला आहे.
शनिवारी (दि.28) महावितरण कंपनीमार्फत विविध दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान शटडाउन घेण्यात येणार आहे. त्यामुळे मनपाचे मुकणे डॅम रॉ वॉटर पंपिंग स्टेशन येथून विल्होळी जलशुद्धीकरण केंद्राला होणारा रॉ वॉटरचा पुरवठा या कालावधीत बंद राहणार आहे. त्यामुळे शनिवारी (दि.28) सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान सिडकोतील काही भाग व नाशिक पूर्व विभागातील काही भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.