Nashik Water Cut: नाशिककरांनो! आजच पाणी भरुन ठेवा; 2 डिसेंबरपर्यंत पाणी बंद राहणार

Kalvan News: कळवणला काही भागांत चार दिवस पाणी बंद; ओतूर रोड परिसरात पाइपलाइन दुरुस्तीचे काम सुरू
Water Scarcity
Water Cut(Pudhari File Photo)
Published on
Updated on

कळवण (नाशिक) : नगरपंचायत हद्दीतील ओतूर रोड जलकुंभ व वाचनालय परिसरातातील जलकुंभातून होणारा पाणीपुरवठा चार दिवस बंद राहणार असल्याची माहिती कळवण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले यांनी दिली.

चार दिवस पाणी बंद

शहरात ओतूरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे रस्त्यातून जाणारी पाइपलाइन लीकेज दुरुस्ती व बदलण्याचे काम सुरू असल्याने ओतूर रोड जलकुंभ व वाचनालय जलकुंभातून होणारा पाणीपुरवठा शिवाजीनगर, बस स्टॅण्ड ते ओतूर रोड, फुलामाता चौक, गांधी चौक, सुभाष पेठ, शाहीर लेन, मेन रोड, तलाठी कॉलनी या भागातील पाणीपुरवठा दि. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान चार दिवस बंद राहणार आहे.

Water Scarcity
कळवण नगरपंचायत : नगराध्यक्षपदी कौतिक पगार तर उपनगराध्यक्षपदी हर्षाली पगार बिनविरोध

ही पाइपलाइन लीकेज दुरुस्ती व बदलण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी या तांत्रिक अडचणी विचारात घेऊन उशिरा होणाऱ्या पाणीपुरवठ्याबद्दल कळवण नगरपंचायतीला सहकार्य करावे. पाणी जपून वापरावे, असे आवाहन कळवण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news