Nashik|विकसित भारत जी राम जी योजना - जिल्ह्यात ५० हजारांहून अधिक कुटुंबांना मिळणार लाभ

Viksit Bharat Gharam Ji Yojana Nashik- अकुशल मजुरांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट
MGNREGA
MGNREGA: मनरेगा आणि जी राम जी!Pudhari
Published on
Updated on

नाशिक : विकसित भारत - रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील अकुशल कामगारांना तब्बल ४४ लाख ४३ हजार दिवस रोजगार देण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यातील सुमारे ५० हजार ६३६ कुटुंबांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

केंद्र सरकारने 'महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा' (मनरेगा) च्या जागी 'विकास भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान (ग्रामीण)' (व्हीबी-जी राम जी) लागू केले आहे. या अंतर्गत अकुशल शारीरिक करण्यास स्वेच्छेने काम असलेल्या प्रत्येक ग्रामीण कुटुंबातील प्रौढ सदस्यांना आर्थिक वर्षात १२५ दिवसांच्या मजुरी रोजगाराची हमी या अभियानांतर्गत देण्यात आली आहे.

या अभियानांतर्गत जिल्ह्यात घरकुले, गोठे, विहिरी, बांध वृक्षलागवड, गट वृक्षलागवड, दगडी बांध, जलधारा, शेततळे, पानंद रस्ते, फळबाग लागवड अशा विविध कामांच्या माध्यमातून अकुशल मजुरांना तयार रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत ३६ हजार २६९ कुटुंबातील ५७ हजार ७९१ मजुरांना रोजगार मिळाला आहे. यावर सुमारे ४० कोटी रुपयांचा खर्च झाला असून, यात ३१ कोटी अकुशल मजुरी स्वरूपात तर, ९ कोटी कुशल निधीच्या स्वरूपात खर्च करण्यात आला आहे.

MGNREGA
Vaishnav Mela Nashik Road - नाशिकरोडला भरला वैष्णवांचा मेळा

यात सुरगाणा तालुक्याने सर्वाधिक उद्दिष्ट ९५.४६ टक्के देवळा तालुक्यात सर्वात कमी म्हणजे केवळ ६८.१३ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे. विशेष म्हणजे मनरेगा योजनेत किमान ३१२ रुपये मजुरी दिली जात होती. त्यात आता वाढ करण्यात

MGNREGA
Nashik District Bank loan waiver-जिल्हा बँकेच्या कर्जमाफीतून करदाते, मंत्री अन् बड्या नोकरदारांची गच्छंती!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news