वणीचे तलाठी १० हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

Nashik News | लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सापळी लावून कारवाई
Vani talathi caught in bribery scandal
वणीचे तलाठी शांताराम गांगुर्डे १० हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले. Pudhari Photo
Published on
Updated on

वणी; पुढारी वृत्तसेवा: शेतजमिनीवर कर्ज काढण्यासाठी शेतजमिनीच्या नोंदीत फेरफार करुन देण्यासाठी पंचासमक्ष लाचेची मागणी करुन दहा हजारांची लाच शासकीय कार्यालयात स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी लावलेल्या सापळ्यात वणीचे तलाठी शांताराम पोपट गांगुर्डे अडकले. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये वणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आज (दि.२६) करण्य़ात आली. (Nashik News)

याबाबत प्राप्त माहिती अशी की , तक्रारदार यांचे मालकीची कसबे वणी (ता. दिंडोरी) येथे गट क्रमांक ६१७ ही शेतजमीन असून त्यावर कर्ज काढावयाचे असल्याने कसबे वणी गावचे तलाठी शांताराम गांगुर्डे (रा, ध्रुवनगर, मोतीवाला मेडीकल कॉलेजसमोर, रेणुका हाईट्स, प्लॅट नंबर ९, सातपुर, नाशिक) यांची भेट घेऊन शेतगटाच्या नोंदी मिळणेबाबत विनंती करुन फेरफार नोंदीची मागणी केली.

तेव्हा त्यांनी सदर नोंदी या दिंडोरी तहसील कार्यालयात मिळतील, असे तक्रारदारास सांगितले .त्याप्रमाणे तक्रारदार दिंडोरी तहसील कार्यालयात गेले असता आवश्यक नोंदी मिळाल्या. मात्र, सध्याच्या तीन नोंदी वणी येथील तलाठी यांच्याकडे मिळतील असे सांगितले. तक्रारदार यांनी पुन्हा गांगुर्डे यांची भेट घेतली. त्यावेळी नंबर ६१७ चे उताऱ्यावरील शेतजमीन आकाराबाबतच्या नोंदी चुकीच्या झाल्या असून त्या दुरुस्तीसाठी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस नाईक विनोद चौधरी, पोलीस शिपाई अनिल गांगोडे, चालक पोलीस नाईक परशुराम जाधव यांनी सापळा लावून केली. शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास त्वरीत संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी केले आहे. (Nashik News)

Vani talathi caught in bribery scandal
नाशिक : डॉ. वैशाली झनकर-वीर यांना ८ लाखाच्या लाच प्रकरणात जामीन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news