Nashik | वडनेरभैरवच्या जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने पश्चिम बंगालमध्ये मृत्यू

आज अंत्यसंस्कार

Nashik | Vadnerbhairav ​​jawan dies of heart attack in West Bengal
वडनेरभैरवच्या जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने पश्चिम बंगालमध्ये मृत्यू
Published on
Updated on

चांदवड : भारतीय सीमा सुरक्षा दलातील जवान सचिन सुरेश सूर्यवंशी (३४) यांचा पश्चिम बंगाल येथे आंतरराष्ट्रीय सीमेवर कर्तव्य बजावताना हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. सूर्यवंशी हे वडनेरभैरव येथील वरच्या कोळीवाड्यातील आहेत. वडनेरभैरव येथील सुरेश सूर्यवंशी या शेतमजुराचा मुलगा सचिन हा सीमा सुरक्षा दलामध्ये कार्यरत होता. ड्युटीवर असताना शुक्रवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

सचिन यांचे पार्थिव सोमवारी (दि. ७) सकाळी विमानाने ओझर येथे येणार आहे. तेथून वडनेरभैरव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. त्याच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ आदी परिवार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news