Uber Drivers Protest Nashik | नाशिकमध्ये उबेर चालक आक्रमक! खासगी वाहनचालकांकडून मारहाण आणि दमदाटी होत असल्याचा आरोप

Uber Drivers Protest Nashik | खासगी वाहनचालक यांच्याकडून सातत्याने होत असलेला त्रास बंद व्हावा, यासाठी उबेर कंपनीने दर वाढून देण्यात यावे यासह विविध मागण्यांसंदर्भात शुक्रवारी उबेर वाहनचालकांनी एकत्र येत आंदोलन केले.
Uber
UberPudhari
Published on
Updated on

सिडको : पुढारी वृत्तसेवा

उबेर या कंपनीशी टायअप करून व्यवसाय करीत असलेले वाहनचालक हे ग्राहकांकडून कमी पैसे घेत असल्याचा आरोप खासगी वाहनचालकांकडून केला जात असून, या खासगी वाहनचालकांकडून उबेरचालक यांच्या वाहनांचे नुकसान करण्याबरोबरच वाहनचालकांना मारहाण करण्याचे प्रकारही सातत्याने घडत आहे.

Uber
Nashik IT Company Protest | भाजप आक्रमक! नाशिकच्या 'त्या' आयटी कंपनीबाहेर जोरदार आंदोलन; मुख्य अधिकारी बेपत्ता?

खासगी वाहनचालक यांच्याकडून सातत्याने होत असलेला त्रास बंद व्हावा, यासाठी उबेर कंपनीने दर वाढून देण्यात यावे यासह विविध मागण्यांसंदर्भात शुक्रवारी उबेर वाहनचालकांनी एकत्र येत आंदोलन केले.

अंबड पोलिस स्टेशनलगत असलेल्या सत्यम मंगल कार्यालय या ठिकाणी उबेर या कंपनीचे कार्यालय आहे. या ठिकाणी नाशिक शहरातील बहुतांशी सर्वच चारचाकी वाहनचालकांनी एकत्र येत उबेर कंपनी कार्यालयातील व्यवस्थापकास दरवाढीबाबत तसेच खासगी वाहनचालकांकडून होत असलेल्या त्रासाबाबत निवेदन सादर केले.

Uber
Ashok Kharat Nashik Case | 'चौकशीपेक्षा मरण परवडेल!'; सततच्या चौकशीमुळे भोंदू अशोक खरात मानसिकदृष्ट्या खचला

त्या निवेदनात उबेर वाहनचालक है नाशिक ते त्र्यंबकेश्वर तसेच नाशिकरोडपासून ते त्र्यंबक याबरोबरच नाशिक ते ओझर तसेच ओझर एअरपोर्ट ते त्र्यंबक अशा बऱ्याच ठिकाणी नाशिकमध्ये प्रवाशांना उबेर कंपनीने ठरवून दिलेल्या दरामध्ये घेऊन जात असल्याने त्र्यंबकेश्वर, नाशिकरोड सुला वाइन या ठिकाणी असलेल्या खासगी चारचाकी वाहनांकडून उबेरचालकास दमदाटी करण्याचा व मारहाण करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

याबाबत वाहनचालकांनी उबेर कार्यालय येथे जमून मारहाण करणाऱ्या खासगी वाहनचालकांचा निषेध करण्याबरोबरच उबेर कंपनीने दर वाढवून देण्यात यावे, याबाबत मागणी करण्यात आली. यावेळी अविनाश खाडे, दर्शन येलमामे, दिनेश साळवे, मयूर चौधरी, विजय सांगळे, किरण आव्हाड, युवराज खैरनार, शेखर खैरनार, दिगंबर अहिरे तसेच नाशिक शहरातील शेकडो उबेर वाहनचालक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news