

मालेगाव : जन्म प्रमाणपत्र दाखल्याप्रकरणी छावणी पोलिसांत आणखी दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या संशयितांना बुधवारी (दि.12) अटक केली असून, यात एका वकिलाचा समावेश आहे. दोघांना गुरुवारी (दि.13) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने वकिलाला एक दिवसाची, तर दुसर्यास 17 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
संशयित अॅड. अल्ताफ अहमद फय्याज अहमद व साबीरअली वाहीदअली यांनी जन्मदाखला बनविण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून त्याचा वापर करून तहसील कार्यालयाची फसवणूक केल्याची फिर्याद तहसीलदार विशाल सोनवणे यांनी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक करून गुरुवारी (दि.6) दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने संशयित अॅड. अल्ताफ अहमद यास एक दिवसाची, तर साबीरअली यास सोमवार, दि. 17 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी यापूर्वी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.