Trimbakeshwar Drowning | बेझे धरणात बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; 2 लेकींसह वडिलाचा अंत

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी शिवारात घटना
Trimbakeshwar Anjaneri Beze Dam Drowning
Trimbakeshwar Anjaneri Beze Dam Drowning Pudhari
Published on: 
Updated on: 

Trimbakeshwar Anjaneri Beze Dam Drowning

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी शिवारात असलेल्या बेझे धरणात आंघोळीसाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (दि.११) घडली. मृतांमध्ये वडिलांसह त्यांच्या दोन मुलींचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी शिवारात बेझे धरणाच्या लगत उत्तम चव्हाण यांचे घर आहे. त्यांच्या घरी पाहुणे म्हणून आलेले भोर कुटुंबातील तिघे जण आंघोळीसाठी धरणावर गेले होते. यावेळी सुरेश नामदेव भोर (वय ४२), ज्योती सुरेश भोर (वय १०) आणि हर्षदा सुरेश भोर (वय ७) हे तिघे धरणाच्या पाण्यात उतरले.

Trimbakeshwar Anjaneri Beze Dam Drowning
Palghar Trimbakeshwar Road: पालघर ते नाशिक प्रवास होणार जलद!दिवाळीनंतर कामाला सुरुवात

आंघोळ करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. या दुर्घटनेत तिघांचाही मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

या घटनेतील मृतांमध्ये वडील आणि त्यांच्या दोन चिमुकल्या मुलींचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पाहुणे म्हणून आलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने चव्हाण कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.