

नांदगाव (नाशिक) : पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याविरोधात भारतीय लष्कराने केलेल्या "ऑपरेशन सिंदूर" व त्यानंतर केलेल्या यशस्वी लष्करी कारवाईच्या समर्थनार्थ भारतीय सैन्याच्या शौर्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी भालूर मंडलाच्या मंडल अध्यक्षा मनिषा भारत काकड यांच्या नेतृत्वाखाली लोहशिंगवे येथे तिरंगा रॅली काढण्यात आली.
ग्रामपंचायत कार्यालयापासून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. "भारत माता की जय, जय जवान जय किसान, सुन ले बेटा पाकिस्तान बाप तेरा हिन्दुस्तान, वंदे मातरम्" अशा घोषणांच्या जयघोषात गावातून रॅली हनुमान मंदिर चौकात आल्यानंतर राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.
रॅली मध्ये सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते सजन तात्या कवडे, हभप भावराव महाराज निकम, रघुनाथ अण्णा सोमासे, डॉ. राजेंद्र आहेर, भारत काकड, संदिप पवार, नथुजी हेंबाडे, आशोक आयनोर, तुकाराम निकम, विजय भुसनर, रविंद्र कवडे, सुभाष पवार, विक्रम निकम, रामकृष्ण हेंबाडे, श्रावण हेंबाडे, विनायक महाराज हेंबाडे, मांगीलाल माळी, राजेंद्र निकुले, धर्मराज शेळके, दत्तू हेंबाडे, रामभाऊ हेंबाडे, दगू पवार, राजू हेंबाडे, दत्तात्रेय आलगट, बाळू मोरे, सुखदेव चव्हाण, सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.