

नाशिक: मराठी रसिकांचे आपल्या निखळ अभिनयाद्वारे मनोरंजन करणारे सिनेअभिनेते शरद पोंक्षे, सुनील बर्वे व भरत जाधव सोमवारी (दि. 12) सायंकाळी 5 वाजता इंदिरानगरवासियांच्या भेटीला येत आहे.
यशश्री कन्स्ट्रक्शनच्या सहकार्याने सयाजी हॉटेलच्या मागे पूर्णत्वास येत असलेल्या "शशी सिद्धी" या लक्झरीयस गृहप्रकल्पाला हे कलाकार भेट देणार आहेत. यावेळी ते "यशश्री गप्पा" या कार्यक्रमात नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणार असल्याची माहिती बांधकाम व्यावसायिक विराज लोमटे यांनी दिली
प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक विराज लोमटे यांच्या यशश्री कन्स्ट्रक्शनने नाशिकच्या बांधकाम व्यवसायात दर्जा, गुणवत्ता व पारदर्शकतेचा नवीन मापदंड निर्माण केला आहे. सुवास्तु या भव्य गृहनिर्माण प्रकल्पासह त्यांनी बांधलेल्या शेकडो गृहनिर्माण प्रकल्पांना मिळालेला प्रतिसाद ही दर्जेदार कामाची पावती आहे. सध्या इंदिरानगरामधील सर्वोत्कृष्ट सेंट्रलाईज लोकेशन तसेच शांत परिसर असलेल्या व अत्यंत गुणवत्ता पूर्ण बांधकाम असणाऱ्या सयाजी हॉटेलमागील शशी - सिद्धी अपार्टमेंटला हे तिघे कलाकार भेट देणार आहेत. नाशिककरांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन "टीम यशश्री" ने केलेले आहे.