

देवळा : शहरात दुचाकी चोरींची मालिका सुरू असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात पोलिस अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील खुंटेवाडी येथील किराणा व्यावसायिक गिरीष भामरे यांची दुचाकी (एमएच ४१ एन ५३२७) रविवारी (दि. १५) दुपारी ३ वाजेच्या सुमारास चोरट्याने पळविली. ते बाजार करुन परतल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला.