नाशिक : उद्योग उभारण्यास भूखंडच शिल्लक नाही; इंडोनेशियाची गुंतवणूक परतली

Entrepreneurs are claiming : उद्योजकांचा दावा; सातपूर, अंबडमधील १२ मोठ्या कंपन्यांचे केले तुकडे
industry news
उद्योगpudhari file photo
Published on
Updated on

नाशिक : मायको, महिंद्रा या कंपन्यांनंतर नाशिकमध्ये एकही मोठा उद्योग आला नसल्याने, नाशिकच्या औद्योगिक विकासाला काहीसी खिळ बसली आहे. वास्तविक, सातपूर, अंबड या औद्योगिक वसाहतींमध्ये मोठे उद्योग येण्यास उत्सुक आहेत. परंतु, या वसाहतींमधील मोठ्या उद्योगांच्या भूखंडांचे तुकडे केले गेल्याने, मोठ्या समूहाच्या उद्योगांना भूखंडच शिल्लक नसल्याची स्थिती आहे. परिणामी भूखंडांअभावी इंडोनेशियासह अहमदाबाद, इंदूर, बंगळुरू येथील मोठी गुंतवणूक परतल्याचा दावा उद्योजकांकडून केला जात आहे. (Entrepreneurs are claiming that large investments in Indonesia, Ahmedabad, Indore, Bangalore have returned due to lack of plots)

जिल्ह्यात सातपूर ६३४.५१, तर अंबड ५१५.९५ हेक्टरवर विस्तारलेल्या या दोन्ही प्रमुख औद्योगिक वसाहती आहेत. या वसाहतींमध्ये मोठे तसेच लघु, मध्यम व सूक्ष्म स्वरूपाचे उद्योग कार्यरत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही वसाहतींमध्ये मोठ्या भूखंडांचे तुकडे करणारे रॅकेट सक्रिय झाल्याने मोठ्या समूहाच्या उद्योगाला जागाच शिल्लक नसल्याची स्थिती आहे. या तुकडे-तुकडे गँगने आतापर्यंत दोन्ही औद्योगिक वसाहतींमधील तब्बल १२ मोठ्या कंपन्यांच्या भूखंडांचे तुकडे केले आहेत. त्यात सातपूरमधील सात, तर अंबडमधील पाच मोठ्या उद्योगांचा समावेश आहे. या गँगकडून बंद पडलेल्या किंवा बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या उद्योगांवर डोळा ठेवला जातो. त्यानंतर भूखंडांचे तुकडे करून अवाच्या सव्वा भावाने त्याची विक्री केली जाते. परिणामी, या दोन्ही औद्योगिक वसाहतींत मोठा उद्योग येणे आता अवघड झाले आहे. यातूनच इंडोनेशियासह, अहमदाबाद, इंदूर, बंगळुरू येथील गुंतवणूक परतल्याचा दावा औद्योगिक संघटनांकडून केला जात आहे.

पायाभूत सुविधांची बोंब

भूखंडांचे तुकडे केल्यानंतर या ठिकाणी सूक्ष्म, लघु उद्योगांचे जाळे निर्माण झाले असले, तरी पायाभूत सुविधांची मात्र बोंब आहे. 'एमआयडीसी'च्या अधिकृत दराच्या पाचपट ते सहापट दर मोजूनदेखील संबंधित बिल्डरने पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याने याठिकाणचे उद्योजक त्रस्त झालेले आहेत. रस्ते, पाणी, वीज यांसारख्या प्रमुख सुविधाही याठिकाणी नाहीत. सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बिल्डरने हात वर केल्यामुळे याठिकाणचा उद्योजक कोंडीत सापडला आहे.

उद्योजकांमध्येच वाढली स्पर्धा

एका मोठ्या उद्योगावर हजारो लघु, सूक्ष्म उद्योग अवलंबून असतात. परंतु, मोठ्या समूहाच्या भूखंडांचे तुकडे करून त्याठिकाणी छोट्या उद्योगांचीच संख्या अधिक वाढत असल्याने, काम मिळविताना उद्योजकांमध्ये टोकाची स्पर्धा दिसून येत आहे.

उद्योगमंत्र्यांचा इशारा पण...

उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी तुकडे-तुकडे गँगचा अभ्यास करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा गुरुवारी (दि. ३) दिला होता. मात्र, एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या मते ही संपूर्ण प्रक्रिया अधिकृत असल्याने त्यास आक्षेप घेता येत नाही. त्यामुळे मंत्र्यांनी इशारा दिला असला, तरी 'एमआयडीसी'च मोठ्या उद्योगांसाठी ब्रेक लावत नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

तुकडे-तुकडे गँगमुळेच सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतींत मोठे उद्योग येण्यास ब्रेक लागला आहे. नव्या मोठ्या उद्योगांसाठी भूखंडच शिल्लक नसल्याने अनेक गुंतवणूक परतत आहेत. ही बाब नाशिकच्या विकासाला बाधक ठरणारी आहे. उद्योगमंत्र्यांनी दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्याचा आम्ही पाठपुरावा करू.

धनंजय बेळे, अध्यक्ष, निमा. नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news