

सुरगाणा : सुरगाणा शहरात गेल्या वर्षभरापासून विजेचा कमी दाब असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. येत्या सहा दिवसात हा प्रश्न मार्गी लागला नाही तर सुरगाणा शहर बेमुदत बंद करण्याचा इशारा दिला आहे.
घरगुती व शेती पंपधारकांना गेल्या वर्षभरापासून खंडित व कमी दाबयुक्त वीज पुरवठयाचा सामना करावा लागत आहे. घरातील विजदिवे, पंखे, कुलर, शेतीपंप, संगणक,व विजेवर चालणारी उपकरणे व्यवस्थित चालत नाही. परिसरात पाणीटंचाई आहे. पाणी पुरवठा योजना कमी दाबामुळे निट चालत नाहीत. त्यामुळे परिसरातील जनतेसमोर पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. उभ्या धानशेतीला व्यवस्थित सिंचन होत नसल्याने पीक करपायला लागली आहेत.
यासंदर्भात संबंधित विभागाला पत्र देण्यात आले असून येत्या सहा दिवसात परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर सुरगाणा शहर बेमुदत बंद करण्यात येईल अशा इशारा सुरगाणा नगराध्यक्ष भरत वाघमारे, नगरसेवक सचिन आहेर,योगेश पिंगळे, दिपक थोरात, अर्जुन शिंदे, एकनाथ भोये, प्रशांत आहेर, तुळशिदास जंगम, आदि ग्रामस्थांनी दिला आहे.