

सुरगाणा (नाशिक) : आमदार सत्यजित तांबे याचे काम आदर्शवत सुरू असून आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांसाठी संगणक संच तसेच विद्यालयासाठी पोडियम संच उपलब्ध करून देत शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी मदत होणार असल्याने या निर्णयाचे स्वागत करतो तसेच शाळेची गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी देखील याचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास नक्कीच साधता येईल, असे प्रतिपादन सुरगाणा तालुका समन्वयक वसंत राठोड यांनी केले. ग्रामीण भागातील शाळांना यापूर्वी सुद्धा माजी आमदार सुधीर तांबे यांच्या प्रयत्नाने संगणक संच देत सहकार्य केले आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षा पासूनचे योगदान सुरगाणा तालुक्याला लाभत आहे, असे प्रतिपादन प्राचार्य वाघ यांनी केले
नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या निधीतून सुरगाणा तालुक्यातील माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळा, शासकिय आश्रमशाळा यांना संगणक व पोडियम संचाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नाशिक पदवीधर आमदार तांबे यांच्या संगमनेर कार्यालयातील सुरगाणा तालुका प्रमुख एन. डी. सोनवणे, तुषार गवांदे, सुरगाणा तालुका समन्वयक वसंत राठोड, प्राचार्य वाघ, ओमकार धुम, गंगाराम चौधरी, हेमंत चौधरी, गायकवाड आदी उपस्थित होते.
अनुदानित, माध्यामिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा भेगु सावरपाडा, शहिद भंगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक व विद्यालय अलगुण, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय उबरपाडा (सु), नागेश्वर माध्यमिक विद्यालय भवाडा, माध्यमिक आश्रम शाळा हतगड, डि. पी. विद्यालय बोरगाव, नुतन विद्या मंदीर सुरगाणा, कला व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा, जि. प. शाळा सुरगाणा 1, शासकिय माध्यमिक आश्रम शाळा सालभोये या शांळाचा यामध्ये समावेश असून काही शाळांना संगणक संच तर काहीना पोडियम संच वाटप करण्यात आले. यापूर्वी देखील माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या आमदार निधीतून सुरगाणा तालुक्यातील अनेक शाळांना संगणक, कपाट, पुस्तके भेट देण्यात आली. हा वारसा पुढे नेत आ. सत्यजित तांबे यांनी देखील हा उपक्रम अविरत चालू ठेवल्याने आ. तांबे यांचे सर्वस्तरातुन कौतुक होत आहे