नाशिक : नोकरानेच रचला मालकाला लुटण्याचा कट

पाच जणांची टोळी गजाआड : अल्पवयीनाचा समावेश
क्राईम
महात्मानगर परिसरात सिमेंट मालकाला लुटण्यासाठी नोकरानेच कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. pudhari file photo
Published on
Updated on

नाशिक : महात्मानगर परिसरात सिमेंट मालकाला लुटण्यासाठी नोकरानेच कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी तपास करीत नोकरासह पाच जणांना पकडले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सुपारी देणार्‍या ऑफिसबॉय आणि पाच जणांच्या टोळीस पकडले असून, त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

सिमेंट व्यावसायिक शारिक शेख, दीपक खताळे व ऑफिसबॉय जयेश वाघ हे कारने महात्मानगर पाण्याच्या टाकीजवळ १७ ऑगस्टला रात्री ८.३० च्या सुमारास आले. शारिक शेख व दीपक खताळे दाेन लाखांची रोकड घेऊन कारमधून खाली उतरले. तर ऑफिसबॉय जयेश वाघ हा कार लावत होता. त्यावेळी शारिक शेख व दीपक खताळे यांच्यावर चार युवकांनी चाकू, लाकडी दांडा व मिरची पावडरने हल्ला करीत रोकड ओरबाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनी चोरट्यांना विरोध केल्याने चोरट्यांनी खताळे यांच्या डोक्यावर वार केले. त्यात ते जखमी झाले. त्यानंतर संशयितांनी शेख यांच्यावरही चाकूहल्ला केला. जखमी अवस्थेत खताळे व शेख हे रोकड घेऊन शेजारील इमारतीच्या पार्किंगमध्ये पळाले असता हल्लेखोरांचा डाव फसला. त्यानंतर संशयित दुचाकीवरून पळून गेले. याप्रकरणी दीपक खताळे यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी युवकांवर गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशील जुमडे, पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत (गुन्हे), उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलिस हवालदार रवींद्र मोहिते, गिरीश महाले, गणेश रेहरे, सचिन काळे आदींनी तपास करीत संशयितांची धरपकड केली.

यांना पकडले

ऑफिसबॉय जयेश चंद्रकुमार वाघ (रा. पाइपलाइन रोड, गंगापूर रोड, नाशिक), उदय राजेंद्र घाडगे (२८, त्र्यंबकेश्वर रोड, नाशिक, मूळ रा. कोपरगाव, जि. अहमदनगर), रोहित किशोर लोहिया, (रा. कोपरगाव, जि. अहमदनगर), विराज कैलास कानडे, संकेत किशोर मंडलिक अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

नोकर जयेशवर संशयाची सुई

हल्लेखोरांनी दोघांंवर हल्ला करून लूटमारीचा प्रयत्न केला त्यावेळी ऑफिसबॉय जयेश वाघ याने कोणत्याही प्रकारचा प्रतिकार केला नाही किंवा जखमींना मदत केली नाही. त्यामुळे पोलिसांनी जयेशकडे चौकशी केल्यानंतर इतर हल्लेखोरांची ओळख पटली. जयेश यानेच संशयितांना हल्ला करण्यास सांगितल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी नाशिकमधून उदय घाडगे यास ताब्यात घेतले. त्यानंतर इतरांना कोपरगाव येथून ताब्यात घेतले. संशयितांनी काही दिवस शेख व खताळे यांची रेकी केल्याचेही उघडकीस आले.

हल्लेखोरांसाठी कार्यालयातच मुक्कामाची व्यवस्था

उदघ घाडगे याने ऑफिसबॉय जयेश वाघ याच्या सांगण्यावरून दरोडा टाकल्याचे सांगितले. त्यासाठी उदय घाडगे याने त्याचा कोपरगाव येथील मित्र संकेत मंडलिक (रा. कोपरगाव) याच्या ओळखीने संशयित आरोपी रोहित लोहिया, विराज कानडे व एका विधिसंघर्षित बालकास नाशिक येथे बोलावून घेतले होते. त्यांना १६ ऑगस्ट २०२४ रोजी ऑफिसबॉय जयेश याने तो काम करीत असलेल्या शारिक शेख यांच्या कार्यालयातच राहण्याची व्यवस्था केली

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news