नाशिक : आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला

बेपत्ता महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला
 शोभा विलास जाधव
शोभा विलास जाधव pudhari news network
Published on
Updated on

ओझर : येथील आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विवाहितेचा मृतदेह शुक्रवारी (दि.27) सायखेडा रोडवरील शिव रस्त्यावरील एका विहिरीत आढळून आला. मात्र, ही घटना जीवनप्रवास थांबविल्याचा प्रकार की घातपात हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओझर येथील तानाजी चौकातील रहिवाशी शोभा विलास जाधव (३४) ही विवाहिता १९ सप्टेंबर रोजी घरातून काहीही न सांगता निघून गेल्या होत्या. त्यानंतर शोध घेऊनही त्या आढळून आल्या नाहीत. याबाबत त्यांचे पती विलास महादू जाधव यांनी पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. दरम्यान, शुक्रवारी (दि.२७) रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास भडके वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर विहिरीची मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या शेतमजूराला महिला विहिरीच्या पाण्यावर तरंगताना दिसून आली. त्यांनी तातडीने पोलिसाना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सदर व्यक्ती या शोभा जाधव असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढत पंचनामा करून पिंपळगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news