Nashik Weather Update | नाशिकमध्ये ऑक्टोबर हीटची वेळेआधीच चाहूल! पावसाचे ढग हटताच पारा 30 अंशांपार

Nashik Weather Update | भाद्रपदाचा उष्मा : तापमान ३० अंशांपार; पुढील दिवसांत ३२ ते ३४ अंशांपर्यंत वाढीचा अंदाज
Weather Update
Weather UpdatePudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या दोन दिवसांपासून नाशिकवर दाटलेले पावसाळी वातावरण निवडताच शहराच्या तापमानात अचानक वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून २५ ते २९ अंश सेल्सिअसच्या आसपास असलेले कमाल तापमान आता पुन्हा ३० अंशांच्या पुढे गेले असून, पुढील काही दिवसांत तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Weather Update
Nashik Municipal Corporation | धूरफवारणीत हलगर्जीपणा भोवला! नाशिक महापालिकेची पेस्ट कंट्रोल ठेकेदारांवर 25 लाखांची दंडात्मक कारवाई

त्यामुळे सप्टेंबरअखेरच नाशिककरांना ऑक्टोबर हीटचा चटका जाणवू लागला आहे.
नाशिकमध्येही पावसाच्या विश्रांतीनंतर वातावरणात सातत्याने बदल होत असून, तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांत नाशिकमध्ये पावसाचे ढग आणि ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी होती. त्यामुळे कमाल तापमान ३० अंशांच्या खाली राहिले होते.

अनेक दिवस कमाल तापमान २५ ते २९ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले जात होते. त्यामुळे सप्टेंबरच्या उत्तरार्धातही नाशिककरांना तुलनेने आल्हाददायक वातावरणाचा अनुभव येत होता. मात्र, गेल्या दोन दिवसांत पावसाळी ढग विरळ झाल्यानंतर सूर्याचा तडाखा पुन्हा जाणवू लागला आहे.

Weather Update
Nashik Municipal Corporation | धूरफवारणीत हलगर्जीपणा भोवला! नाशिक महापालिकेची पेस्ट कंट्रोल ठेकेदारांवर 25 लाखांची दंडात्मक कारवाई

परिणामी, कमाल तापमानात झपाट्याने वाढ झाली असून, दिवसा उकाडा जाणवू लागला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत नाशिकच्या कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज असल्याने सप्टेंबरच्या अखेरीसच ऑक्टोबर हीटची चाहूल लागली आहे.

रात्रीही दमटपणा; पहाटे गारवा

केवळ कमाल तापमानातच वाढ झाली नसून, किमान तापमानातही चढउतार जाणवत आहेत. दिवसभर उकाडा आणि रात्री दमट वातावरण, तर पहाटे काही प्रमाणात गारवा, अशी नाशिकच्या हवामानाची विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. या बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असून सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यांसारख्या तक्रारी वाढताना दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news