Nashik Temperature | नाशिककरांना उन्हापासून मोठा दिलासा! कमाल तापमान 36.2 अंशांवर घसरल्याने नाशिकमधील 'पारा' थंडावला

Nashik Temperature | राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सूर्य आग ओकत असताना, नाशिकमधील तापमान ३६.२ अंश सेल्सिअसवर घसरल्याने नाशिककरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
Jalna weather update
हुश्श..! 44 दिवसांनंतर पुण्याचा पारा 36 अंशांवर; कमाल तापमानात 6 ते 8 अंशांनी घटFile Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सूर्य आग ओकत असताना, नाशिकमधील तापमान ३६.२ अंश सेल्सिअसवर घसरल्याने नाशिककरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आठवड्याच्या प्रारंभी तापमान चाळिशीच्या उंबरठ्यावर पोहोचले होते.

Jalna weather update
Nashik Election 2026 | सिंहस्थ, पावसाळापूर्व कामांना आचारसंहितेचा बसला फटका

मात्र, त्यानंतर कमाल तापमानात सातत्याने घसरण होत असल्याने, उन्हाची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. मात्र, किमान तापमान अद्यापही वाढीव असल्याने, उकाडा कायम आहे. मे महिन्याच्या प्रारंभी नाशिकचे तापमान ४२ अंश सेल्सिअसवर गेल्याने, यंदाचा उन्हाळा हा नाशिककरांसाठी तापदायक ठरणार 20 10 असल्याचे संकेत होते. त्यातच मे महिन्यात नाशिकचा पारा ४४ सेल्सिअसवर अंश जाण्याचा अंदाज वर्तविल्याने, नाशिककरांना धडकी भरली होती.

चालू आठवड्याच्या प्रारंभी तापमान चाळिशीजवळ पोहोचले होते. त्यामुळे हा आठवडादेखील तापदायक जाण्याची भीती होती. दरम्यान, मागील दोन दिवसांपासून तापमानात सातत्याने घसरण होत असल्याने, उन्हाची तीव्रता किंचितशी कमी झाली आहे. मात्र, किमान तापमान अजूनही २२.३ अंश सेल्सिअसवर असल्याने, रात्री अन् पहाटे उकाडा जाणवत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news