Nashik Temperature | नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला; निफाडचे तापमान 11 अंश सेल्सिअसवर

Nashik Temperature | नाशिकसह निफाडमध्ये गारठा वाढला; निफाडचे किमान तापमान ११.१ अंश सेल्सिअसवर
Winter Temperature
Winter TemperaturePudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक (पुढारी वृत्तसेवा):

नाशिक शहरासह जिल्ह्यात थंडीचा प्रभाव कायम असून, गेल्या तीन ते चार दिवसांपासून तापमानात किंचित चढ-उतार होत असल्याचे चित्र आहे. त्यानुसार सोमवारी (दि. १६) नाशिक शहरात किमान १४ अंश सेल्सिअस, तर कमाल ३१.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Winter Temperature
Nashik Trimbakeshwar Road | नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाचे रुंदीकरण वेगात; आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग

निफाडमध्ये किमान तापमान ११.१, तर कमाल ३२.१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. दरम्यान, गत तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात थंडी स्थिरावल्याचे दिसून येत असून, उत्तरकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे शहरासह ग्रामीण भागात सकाळी आणि रात्री गारठा जाणवत आहे. नाशिक जिल्ह्यात नोव्हेंबरच्या सुरवातीपासून तापमानात मोठे बदल होत आहेत.

२ नोव्हेंबरला नाशिक शहराचे किमान तापमान २२ अंश सेल्सिअस होते. त्यानंतर त्यात लक्षणीय घट झाली. शनिवारी (दि. १४) पारा १३.४ अंशांवर, तर रविवारी (दि. १५) १२.६ अंशांवर पोहोचला होता. सोमवारी त्यात किंचित वाढ होऊन तापमान १४ अंशांवर स्थिरावले.

Winter Temperature
Nashik Pune Railway Project: नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प पुन्हा चर्चेत; आमदार सत्यजीत तांबे आक्रमक, जनसुनावणीची मागणी!

पहाटेच्या वेळी थंडीचा प्रभाव अधिक जाणवत असून, मॉर्निंग वॉल्कसाठी बाहेर पडणारे नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना गारठ्याचा सामना करावा लागत आहे. रात्री काही ठिकाणी शेकोटीचा आधार घेतला जात आहे. थंड वाऱ्यांमुळे गारवा जात असल्याने नागरिक स्वेटर, जॅकेट आणि मफलरचा वापर करत आहेत.

दरम्यान, किमान आणि कमाल तापमानातील मोठ्या तफावतीमुळे सकाळी-रात्री थंडी, तर दुपारी उन्हाचा अनुभव नागरिकांना येत असून, उत्तरकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव कायम राहिल्यास आगामी काळात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.