नाशिक : पाऱ्यात घसरण झाल्याने नाशिक व परिसरात थंडीचा जोर वाढला आहे. गेल्या तीन दिवसांपासून नाशिकचे तापमान १२.४ अंश सेल्सियसवर स्थीर असून, निफाडचे तापमान १०.३ अंश सेल्सियसवर आल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा किंचित स्वरूपात किमान तापमान घसरल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे.
थंडी आणि नाशिक हे समीकरणच असून, हिवाळीत नाशिक राज्यात सर्वाधिक थंड जिल्हा म्हणून दरवर्षी पुढे येतो. निफाडचे निच्चांकी तापमान तर ४ अंश सेल्सियसपेक्षा कमी असल्याचे यापूर्वी नोंदवले गेले आहे. दरम्यान, यंदा थंडी उशिराने सुरू झाली आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत थंडी गायब होती. परंतु, गेल्या आठवड्यापासून पाऱ्यात सातत्याने घसरण होत असल्याने नाशिकमध्ये थंडी वाढली आहे. जिल्ह्यातील काही भागात शेकोट्या नजरेस पडत आहेत. तसेच बहुतांश भागात धुक्याची चादर पसरत असल्याने, गुलाबी थंडीचा नाशिककर आनंद घेताना दिसून येत आहेत.