Nashik Teachers Constituency | मतमोजणीसाठी ३० तास राबली यंत्रणा

विजयी कोटा निश्चितीसाठी लागले १५ तास
Nashik Teachers Constituency |
मतमोजणीसाठी ३० तास राबली यंत्रणा(छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून महायुतीचे किशोर दराडे यांनी सलग दुसऱ्यांदा विजय संपादन केला. दरम्यान, मतमोजणी तसेच निवडणुकीशी संबंधित बाबींच्या पूर्ततेसाठी यंत्रणेला तब्बल ३० तासांचा कालावधी लागला

अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात सोमवारी सकाळी ८ पासून मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात पाचही जिल्ह्यांच्या मतपेट्या उघडून त्यातील मतपत्रिका एकत्रित करण्यासाठी प्रशासनाचे किमान दाेन ते तीन तास खर्ची पडले. त्यानंतर सर्व ६४,५८३ मतपत्रिकांचे प्रत्येकी एक-एक हजारांचे गठ्ठे तयार करून त्यामधून बाद मतपत्रिका बाजूला काढत विजयासाठीचा कोटा ठरविण्याचे अग्निदिव्य कर्मचाऱ्यांनी पार पाडले. या सर्व प्रक्रियेदरम्यान रात्रीचे ११ वाजले. म्हणजे सकाळी ८ ते रात्री ११ असे सलग १५ तास केवळ कोटा ठरविण्यात गेला. मात्र, त्यानंतर एकाही उमेदवाराने विजयाचा कोटा गाठला नाही. परिणामी, दुसऱ्या पसंतीची मते मोजण्याची वेळ प्रशासनावर ओढवली.

Nashik Teachers Constituency |
Nashik Teachers Constituency | किशोर दराडे दुसऱ्यांदा बनले गुरुजींचा आवाज!

मतमोजणी केंद्रामध्ये रात्री ११ ते मंगळवारी (दि. २) सकाळी १० पर्यंत मतमोजणी पार पडल्यानंतर विजयी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली गेली. परंतु, निकालानंतरही यंत्रणांची सुटका झाली नाही. विजयी उमेदवाराची घोषणा केल्यानंतर पुढील चार तास केवळ आयोगाच्या संकेतस्थळावर निवडणुकीशी संबंधित माहिती भरणे, मतपत्रिकांची उमेदवारनिहाय विभागणी करताना त्या मतपेटीत ठेवणे तसेच मतपेट्या सुरक्षितरीत्या सील करणे आदी प्रक्रिया पार पाडली गेली. मात्र, या संपूर्ण कालावधीत यंत्रणा न थकता कार्यरत होती. दरम्यान, केंद्राच्या ठिकाणी स्वच्छता व पाणीपुरवठ्यासह खानपानासाठी विविध यंत्रणांनी मेहनत घेतली.

पोलिस ऑन ड्यूटी

मतमोजणी प्रक्रियेदरम्यान, महसूलचे अधिकारी-कर्मचारी हे गोदामाच्या आत कार्यरत असले तरी पोलिस विभागाची भूमिका महत्त्वपूर्ण हाेती. मतमोजणीवेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस आॅन ड्यूटी कार्यरत होते. या कालावधीत कधी पाऊस, तर कधी अंगाला झोंबणारे गार वारे सहन करत पोलिसांनी त्यांची भूमिका चोख पार पाडली. त्यामुळे संपूर्ण मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यास मदत झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news