Nashik Teacher Suicide Case | "आजारपणाच्या मानसिक तणावातून शिक्षकाचे टोकाचे पाऊल; रामवाडी पुलावरून गोदावरीत उडी घेऊन आत्महत्या"

Nashik Teacher Suicide Case | आजारपणामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
death
death pudhari File Photo
Published on
Updated on

नाशिक : एका खाजगी शैक्षणिक संस्थेत उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या ३४ वर्षीय युवकाने मंगळवारी (दि. २१) सकाळी रामवाडी पुलावरून गोदावरीत उडी घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. आजारपणामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

death
Nashik Citylink | "एका टॅपद्वारे सिटीलिंकचे भाडे अदा करता येणार! कॅशलेस पेमेंटला नाशिक सिटीलिंक संचालक मंडळाची मंजुरी"

सातपूर येथील विनायक संकुल परिसरातील रहिवासी संदीप मनोहर भांबेरे (३४) हे जिल्ह्यातील एका नामांकित खाजगी शैक्षणिक संस्थेत उपशिक्षक म्हणून कार्यरत होते. मंगळवारी सकाळी सुमारे ८ ला त्यांनी रामवाडी पुलावरून गोदावरी नदीत उडी घेतली.

घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे दत्तात्रय शेळके, किसन गायकवाड तसेच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. भांबेरे यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून एम.एस्सी. पदवी प्राप्त केली होती. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news