Nashik Teacher's Constituency | 'साहेब, हीच का शिक्षक निवडणूक?'

मतपत्रिकांसमवेतच्या चिठ्ठ्या पाहून अधिकारीही चक्रावले
Nashik Teacher's Constituency | 'साहेब, हीच का शिक्षक निवडणूक?'
Published on
Updated on

नाशिक : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीवेळी मतपत्रिकांसमवेत काही चिठ्ठ्या आढळून आल्या. या चिठ्ठ्यांवर घरची परिस्थिती दयनीय असून, शिक्षकांच्या भविष्याचा विचार करत जुनी पेन्शन तत्काळ लागू करावी, साहेब, हीच का ती शिक्षक निवडणूक? असे मजकूर लिहिलेले होते. हे मजकूर पाहून मतमोजणी अधिकारी अधिकारीही चक्रावले.

अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाचे गोदात येथे सोमवारी (दि. १) सकाळी 8 पासून शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीला प्रारंभ झाला. प्रारंभी विभागातील पाचही जिल्ह्यांच्या मतपेट्या उघडून त्यातील मतपत्रिका एकत्रित करण्यात आल्या. त्यानंतर मतपत्रिकांचे एक-एक हजारांचे गठ्ठे करून ते सारख्याच प्रमाणात ३० टेबलवर मोजणीसाठी पाठविण्यात आले. मात्र मोजणीवेळी काही मतपत्रिकांसमवेत अधिकाऱ्यांना चिठ्ठ्या सापडल्या. त्यातील एका मतपत्रिकेसमवेतच्या चिठ्ठीत शिक्षकाने २० ते २५ ओळींचा निबंध लिहिलेला होता. या निबंधात घरची परिस्थिती, तुटपुंजे वेतन, भविष्यातील आर्थिक स्थितीबाबत व्यथा व्यक्त करत, जुनी पेन्शन योजना शासनाने तातडीने लागू अशी मागणी केली.

Nashik Teacher's Constituency | 'साहेब, हीच का शिक्षक निवडणूक?'
Nashik Teachers Constituency | किशोर दराडे यांच्या विजयाची औपचारिकता बाकी

मतमोजणीत एका मतपत्रिकेसह शिक्षकाने लिहिलेली, 'हीच का शिक्षक निवडणूक' अशा आशयाची चिठ्ठी सापडली, तर एका मतपत्रिकेवर शिक्षकाने थेट देवाचे नावच लिहिल्याने ही मतपत्रिका बाद ठरविण्यात आली. देशाची भावी पिढी घडविण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकांनी निवडणुकीत केलेल्या अक्षम्य चुका पाहून अधिकाऱ्यांनी डाेक्याला हात लावले.

मतपत्रिका ठरल्या बाद

मतमोजणीवेळी शिक्षकांना मतपत्रिकांवर पसंतीक्रम देताना त्यातही गल्लत केल्याचे निदर्शनास आले. त्यामध्ये वेगवेगळ्या उमेदवारांच्या नावांपुढे एकच पसंती क्रमांक नमूद करणे, आयोगाने दिलेल्या पेनऐवजी स्वत:कडील पेनने मतपत्रिकेवर पसंतीक्रम लिहिणे, मतपत्रिकेवर स्वत:च्या नावाचा उल्लेख किंवा स्वाक्षरी केलेली असणे तसेच पसंतीक्रम देताना एकाहून अधिक भाषांचा वापर करणे अशा चुका आढळून आल्या. असा मजकूर व चुका आढळलेल्या सर्व मतपत्रिका बाद ठरविण्यात आल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news