

पंचवटी (नाशिक): तपोवनातील जुन्या एसटीपी प्लँटमधील माती थेट राम टेकडीजवळच्या भागातील झाडांवर कुऱ्हाड टाकण्यात आली आहे. या मातीचे ढिगारे तोडलेल्या वृक्षांच्या खोडांवर टाकण्यात येत असल्याने काही झाडांची लहान रोपे त्याखाली दबले गेले आहेत. काही वृक्षांची मुळे खोड व फांद्या या सरपणासाठी रामटेकडीच्या वस्तीतील स्थानिक रहिवाशी नेत आहेत.
जुना एसटीपी प्लँट डांबरी रस्ता व रामटेकडी वस्ती यांच्यामध्ये दाट झाडांच्या खोडांवर पांढरा रंग देऊन त्यावर लाल रंगाने नंबर देण्यात आले आहेत. तेथून रामटेकडीचा भाग उतारावर आहे. त्या उताराच्या भागावर मातीचे ढिगारे पसरविण्यात आले आहे. ही माती पावसाळ्यात खचून रामटेकडीच्या वस्तीत त्याचा चिखल जाण्याची भीती आहे.
मातीचे ढिगारे वृक्षांमध्ये पसरविताना येथील काही वृक्ष गायब झाले आहेत. काही वृक्षाच्या फांद्या, मुळ्या व खोड रामटेकडी वस्तीजवळ पडलेली आहेत. तपोवनातील साधुग्रामच्या जागेवरील प्रस्तावित वृक्षतोडीच्या विरोधात आंदोलन सुरू असताना दुसऱ्या बाजूला वृक्षांवर अशाप्रकारे घाला घातला जात असल्याने पर्यावरण प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.