Nashik | भुताचा फोटो काढा आणि चक्क २१ लाखांचे बक्षीस मिळवा

अंनिस : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे केले प्रबोधन
Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti, Nashik
नाशिक : विद्यार्थ्यांचे प्रबोधन करताना अंनिसचे डॉ. ठकसेन गोराणे.pudhari news network
Published on
Updated on

नाशिक : जगात भूत नसतेच. या सर्व काल्पनिक आणि सांगावांगीच्या गोष्टी असतात. भूत माणसाला पछाडते हा चुकीचा संस्कार आणि समज असल्याने, लहानपणापासूनच भूत आपल्या मनात ठाण मांडून बसतो. जर भूत आहे, अशी कोणाला खात्री असेल तर त्यांनी भुताचा फोटो काढून दाखवावा, त्यास २१ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल, असे खुले आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने देण्यात आले आहे. (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti : If anyone is convinced, take a photo of the ghost and show it and get a reward of 21 lakhs)

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुळेगावातील शाळेमधील महाराष्ट्र अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला. यावेळी गावाबाहेरील वड, चिंच, पिंपळ या मोठ्या झाडांवर भूत असते. अमावास्या, पौर्णिमेच्या रात्री ते खाली उतरते. त्याला जी व्यक्ती सापडेल त्याला पछाडते, असे ठाम मत विद्यार्थ्यांनी मांडल्यानंतर अंनिसच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे प्रबोधन करण्यात आले. अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे म्हणाले, 'भूत असल्याची शहानिशा करण्यासाठी कोणत्याही अमावास्या किंवा पौर्णिमेच्या रात्री अंनिसचे कार्यकर्ते वड, पिंपळ किंवा चिंचेच्या झाडाखाली रात्रभर मुक्कामाला राहतील, असे सांगत भूत ही भ्रामक कल्पना असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांस सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांच्या मनातील अंधश्रद्धा दूर होऊन, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्यासाठी मदत झाल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली. यावेळी पालकांसाठीही अशा प्रकारचा प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्याचे ठरले. यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब कानडे, अंनिसचे मारुती नेटावटे, उपशिक्षक योगेश गोसावी, नंदू बागूल, बाळासाहेब पावडे, काकासाहेब कवडे, सचिन कोकाटे, रामेश्वर शेंडगे, सोनाली परदेशी, अनिल खैरनार आदी उपस्थित होते.

दंडांमध्ये गंडेदोरे

अनेक विद्यार्थ्यांच्या गळ्यात, दंडामध्ये रंगीबेरंगी गंडे-दोरे, तावित बांधलेले दिसले. या मुलांना आजारपणात आई-वडिलांनी भगताकडे नेल्यानंतर हे गंडे-दोरे बांधल्याचे अंनिसच्या कार्यकर्त्यांना सांगण्यात आले. दैवी उपाय म्हणून मंतरलेले गंडे-दोरे बांधून आजार बरा होत नसल्याचे विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यात आले. सकस, शुद्ध, समतोल आहार सेवन केल्याने आजारपण येत नाही, त्यामुळे आजारपणात भगताकडे न जाता डॉक्टरांकडे जा, असे आवाहनही डॉ. गोराणे यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news