

सुरगाणा : लाच स्वीकारल्याप्रकरणी सुरगाण्याचे गटविकास अधिकारी महेश पोतद्दार यांना अटक झाल्याने रिक्त झालेल्या पदावर पेठ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी यांच्याकडे कार्यभार सोपविला आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील बिलाची रक्कम काढून देण्याच्या मोबदल्यात दोन लाख दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागातील पोलीस पथकाने मंगळवार (दि.25) रोजी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी त्यांना अटक झाल्याने सुरगाणा पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या पदी पेठचे गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी यांची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी पुढील आदेशापर्यंत केली आहे.