Nashik earthquake: सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे धक्के

एका मागून एक चार धक्के : रिश्टर स्केलवर ३.६ तीव्रतेची नोंद
Earthquake
Earthquake
Published on
Updated on

बोरगाव : सुरगाणा तालुक्यातील बोरगाव घाटमाथा परिसरात शनिवारी (दि.२५) सकाळी भूकंपाचे सलग चार सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकां काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. पहिला मोठा धक्का सकाळी ९.५५ बसला. त्याची तीव्रता ३ रिश्टर स्केल इतकी असल्याचे प्रशासनाने सांगितले.

भूकंपाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कळवणच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी काश्मिरा संख्ये, तहसीलदार रामजी राठोड व पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्यासह मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी अनेक गावांना भेट देत पाहणी केली.

Earthquake
Hingoli Earthquake | हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा धक्का, 3.1 रिश्‍टर स्केलची नोंद

सुरगाणा तालुक्यातील बोरगाव, सराड, घागबारी, हतगड, भिंतबारी, राहुडे, मांजरापाडा, शिवपाडा, शिंदे दिगर, हरणटेकडी, वांजूळपाडा, रोटी अशा २० ते २५ गावांमध्ये हे धक्के जाणवले. यासह दिंडोरीतील भनवड येथेही धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच अनेक नागरिक घराबाहेर पडले. दुसरा धक्का १०.०१ वाजता बसला.

Earthquake
Hingoli earthquake : हिंगोलीत पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के; कोणतीही जीवित वा वित्तहानी नाही

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, अचानक झालेल्या धक्क्यांमुळे नागरिकांत काही काळ घबराट पसरली होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू गुजरातमधील वापी परिसरात असल्याचे समजते. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन तहसीलदार रामजी राठोड यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news