

नाशिक : सतीश डोंगरे
भोंदू अशोक खरात प्रकरण समोर आल्यापासून, जिल्ह्यातील भोंदू बुवा-बाबांचा सातत्याने पर्दाफाश केला जात आहे. आतापर्यंत सहा भोंदूंचा दरबार उधळण्यास पोलिसांना यश आले असून, अजूनही बरेच भोंदू पोलिस आणि 'अंनिस'च्या रडारवर आहेत.
या सर्वच भोंदंकडे वन्यप्राण्यांचे अवयव आढळून आल्याने, जादूटोण्यासाठी वन्यप्रण्याच्या तस्करीसाठी जिल्ह्यात रकेट सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वशीकरण, लक्ष्मीप्राप्ती, शत्रूनाश, गुप्तधन, प्रेमप्रकरणात यश, व्यवसायात भरभराट आदींचे आमिष दाखविण्यासाठी भोंकडून वन्यप्राण्यांच्या अवयवयांचा वापर केला जात आहे.
कासव, घोरपड, घुबड, साप, बिबट्या, वाघ, मोर, काळवीट आदी प्राण्यांच्या अवयवांचा वापर जादूटोण्यासाठी केला जातो. काळी जादू आणि लैंगिक शक्ती वाढवण्याच्या नावाखाली या प्राण्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. जिल्ह्यात याबाबतचे रॅकेटच सक्रिय असल्याचा संशय असून, तस्कर तथा शिकारी हे भोंदूबाबांना या प्राण्यांचे अवयव देत असावेत, असाही संशय आहे. भोंदू खरात याच्याकडे देखील वन्यप्राण्यांचे अवयव आढळून आले होते.
याशिवाय अन्य पाच भोंदूंकडे देखील वन्यप्राण्यांचे अवयव आढळून आले असून, इगतपुरी तालुक्यातील गिरणारे (बनवाडी) येथे वनविभागाने टाकलेल्या एका भोंदूच्या घरावरील छाप्यात देखील काळविटाचे शिंगे, घुबडाचे अवयव, सालिंदरचे काटे, मोरपिसे हस्तगत करण्यात आली आहेत.
त्याने हे अवयव कुठून आणले, ती यासाठी रॅकेट चालवायचा काय? आदींबाबतचा सध्या तपास केला जात आहे. रम्यान, भारतात वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत अनेक प्राणी संरक्षित आहेत, त्यांची शिकार, अवयव बाळगणे किंवा विक्री करणे हा गंभीर गुन्हा असून, आतापर्यंत या कायद्याअंतर्गत अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आली आहेत.
भोंदू बुवा-बाबांकडून फसवणूक वन्यप्राण्यांची शिकार करणे वापरले जातात. करण्यासाठी वन्यप्राण्यांचे अवयव इगतपुरीत असाच प्रकार समोर आला आहे. या भोंदूविरोधात वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र, त्यात जाट्टोणाविरोधी कायद्याअंतर्गत कलम लावावे.
- कृष्णा चांदगुडे, सहकार्यवाह, 'अंनिस
वन्यप्राण्यांची शिकार करणे कायद्याने गंभीर गुन्हा आहे. a शिकारी तथा तस्कर यांना रोखण्यासाठी वनविभागाकडून सातत्याने पेट्रोलिंग केली जाते. यासाठी अन्य उपाययोजनांच्या माध्यमातून वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी वनविभाग तत्पर असतो.
- सुमित निर्मळ, वनपरिक्षेत्र अधिकारी