

मनमाड (नाशिक) : सर्व शिक्षण अभियाना अंतर्गत शासनाकडून इयता पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक दिले जातात. या अंतर्गत शहरातील मराठी, उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी 23 हजार 224 पुस्तके प्राप्त झाली आहे.
सोमवारी (दि. 16) शाळा सुरू झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्याच दिवशी स्वागत करून त्यांना पुस्तके दिली जाणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे अधिकारी मनीष गुजराथी यांनी दिली.
शिक्षणापासून कोणी ही वंचित राहू नये म्हणून सर्व शिक्षण अभियाना अंतर्गत शासनाकडून इयता पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक दिली जातात. शहरात पालिकेच्या मराठी माध्यमच्या 12, उर्दू माध्यम तीन अशा एकूण 15 शाळा असून या व्यतिरिक्त अनुदानित शाळा तीन, विद्यालय आठ अशा एकूण 21 शाळा आहेत. त्यात इयता पहिले ते आठवीपर्यंत शिक्षण घेणारे सात हजार 90 विद्यार्थी असून त्यांच्यासाठी शासनाकडून पुस्तके शिक्षण मंडळाला प्राप्त झाली आहेत. सर्व पाठ्यपुस्तके शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मनीष गुजराथी, केंद्र समन्वयक दीपक भावसार, समाधान ठोके, उर्दू शाळा क्र 19 च्या मुख्याध्यापिका रिझवाना, एजाज शेख यांच्याकडे देण्यात आली असून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके दिली जाणार आहे.