

देवळाली कॅम्प (नाशिक): नाशिक तालुक्यातील बेलतगव्हाण येथे झालेल्या वादळी वाऱ्याने झाडे पडली असून काही घरांची छप्पर देखील उडून गेले आहे. या नुकसानीचे महसूल विभागाने पंचनामे केले आहे.
तालुक्यातील दारणा किनारी असलेल्या बेलतगव्हाण येथे मोठ्या प्रमाणावर वादळी वारे आल्याने अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली. शिवाय घरावरील पत्रे तसेच छप्पर देखील उडून गेले. पिकांचेही नुकसान झाले आहे. याबाबत नाशिक तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष तथा बेलतगव्हाण सरपंच मोहनीश दोंदे यांनी प्रशासनाकडे पंचनाम्याबाबत मागणी केली होती. तलाठी स्मिता डोंगरे तसेच शेतकरी बबन महानुभाव , बापू आहिरे, धनंजय धुर्जड हे शेतकरी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले.