

राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे गेल्या चार महिण्यांमध्ये ६० अपघात झाले आहे. यामध्ये सहा अपघातांमध्ये प्रवाशी मृत्यूमुखी पडले आहे तर उर्वरित ५४ अपघातांमध्ये प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. महामंडळाद्वारे देण्यात आळेल्या माहीतीमधून ही बाब समोर आली आहे. राज्य परिवहन महामंडळ इ बसेसकडे पाऊल टाकत असले तरी देखील कालबाह्य झालेल्या बसेस अपघातांना प्रमुख कारण ठरत आहेत. याबसेसमुळे राज्याने आधूनिक बसेस वापराव्या अशी ओरड प्रवाशांकडून होताना दिसत आहे.
राज्य शासनाच्या वतीने राज्य परिवहन महामंडळ सक्षम करण्यासाठी वेळोवेळी नवनवीन योजना काढण्यात येत आहे. महिलांना अर्धे तिकीट, ७५ वयापुढील प्रवाशांना मोफत प्रवास तसेच तिर्थयात्रेसाठी विशेष पॅकेज या प्रकारच्या योजना राज्य शासन तयार करत असते. यामाध्यमातून प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यात येतात. जिल्ह्यामध्ये यांना चांगला प्रतिसाद मिळत असला तरी देखील अपघातांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
जिल्ह्यामध्ये यंदाच्या आर्थिक वर्षात २०२४-२५ मध्ये पहिल्या चार महिण्यातच ६० अपघात झाले आहे. यामध्ये प्रमुख कारणे म्हणजे कालबाह्य झालेल्या गा़ड्या, वेळोवेळी देखभालदुुरुस्तीचा अभाव, चालकांचा असमन्वय यांचा समावेश आहे. एका बसमध्ये साधारण ५० ते ६० प्रवाशी एका वेळी प्रवास करत असतात. या सर्वांचे जीवन महामंडळाच्या बस आणि चालकांच्या हातात असतात. त्यामुळे महामंडळाने आपल्या कार्यप्रणालीमध्ये सजगता दाखवायला हवी अशी अपेक्षा सर्वसाधारण प्रवाशी व्यक्त करताना दिसत आहेत.