Nashik | पेड दर्शनाबाबत लवकरच निर्णय ; नवरात्रोत्सवासाठी कालिका मंदिराचा प्रस्ताव

पेड दर्शनाबाबत लवकरच निर्णय
कालिका मंदिर, नाशिक
कालिका मंदिर, नाशिकpudhari news network
Published on
Updated on

नाशिक : शारदीय नवरात्रोत्सवात कालिकामाता मंदिरात भाविकांसाठी 'पेड दर्शन' या पर्यायावर लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष अण्णा पाटील यांनी दिली.

यंदा 3 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. दरवर्षीप्रमाणे नवरात्रोत्सवात कालिकामाता मंदिरास दररोज एक लाख भाविक भेट देतात. सरासरी दर तासाला 10 हजार भाविक कालिकामातेचे दर्शन घेतात. उत्सवादरम्यान मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही पेड दर्शनाबाबत संस्थानतर्फे विचारविनिमय सुरू आहे. अनेक भाविक संस्थानने ठरविलेली रक्कम अदा करून तत्काळ दर्शन घेण्यास इच्छुक असतात. अशा भाविकांची सोय व्हावी, या हेतूने संस्थानतर्फे पेड दर्शनाचा पर्याय दरवर्षी खुला करण्यात येत असतो. यंदाही या विषयावर संस्थानतर्फे विचारविनिमय सुरू असून, भाविकांच्या बाजूने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अध्यक्षांनी दिली.

ज्या भाविकांना तत्काळ दर्शन हवे आहे, त्यांना संस्थानने ठरविलेली फी अदा करून दर्शन घेणे सुलभ व्हावे यासाठी विचारविनिमय सुरू आहे. भाविक अनेक तास रांगेत ताटकळत उभे राहतात. त्यांच्यासाठी पेड दर्शनाचा पर्याय सुलभ ठरणारा आहे. लवकरच त्यावर निर्णय घेण्यात येईल.

केशव (अण्णा) पाटील, अध्यक्ष, कालिकामाता संस्थान, नाशिक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news