SMBT Heart Institute Nashik | एसएमबीटीत 100 दिवसांत 100 'की-होल' हृदय शस्त्रक्रिया

SMBT Heart Institute Nashik | अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहाय्याने एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटने अवघ्या १०० दिवसांत १०० मिनिमली इन्व्हेजिव्ह कार्डियाक अर्थात 'की-होल' हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करून महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
SMBT Heart Institute Nashik
SMBT Heart Institute Nashik
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहाय्याने एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटने अवघ्या १०० दिवसांत १०० मिनिमली इन्व्हेजिव्ह कार्डियाक अर्थात 'की-होल' हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करून महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.

SMBT Heart Institute Nashik
Medical Breakthrough Treatment |दिवसातून १२ वेळा थांबायचे ‘तिचे’ हृदय नाविन्यपूर्ण प्रभावी वैद्यकीय उपचाराने रुग्णांना दिले जीवदान

छातीचे हाड न कापता, लहान चिरांतून करण्यात येणाऱ्या या शस्त्रक्रियांमुळे रुग्णांना कमी वेदना, कमी रक्तस्राव, संसर्गाचा कमी धोका आणि जलद पुनर्वसनाचा लाभमिळत आहे. एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये बायपास सर्जरी, हार्ट व्हॉल्व्ह रिपेअर व रिप्लेसमेंट, जन्मजात हृदयातील छिद्र बंद करणे तसेच हृदयातील गाठी काढण्यासारख्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केल्या जात आहेत.

विशेष म्हणजे, शासकीय आरोग्य योजनांतर्गत या जागतिक दर्जाच्या उपचारांचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोफत मिळत आहे. हार्ट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आतापर्यंत ३० हजारांहून अधिक हृदयरुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, नवजात बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया येथे केल्या जातात.विभागप्रमुख डॉ. गौरव वर्मा आणि हृदयविकार शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. विद्युतकुमार सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील टीम २४ तास रुग्णसेवेसाठी कार्यरत आहे.

सर्वसामान्यांना जागतिक दर्जाची आरोग्यसेवा मोफत उपलब्ध करून देणे हा संस्थेचा ध्यास असून, १०० दिवसांत १०० यशस्वी शस्त्रक्रिया ही त्या प्रयत्नांची पावती आहे. समृद्धी महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा तसेच ठाणे, कल्याण, भिवंडी आणि मध्य प्रदेशातील रुग्णांनाही या सुविधेचा मोठा लाभ होत आहे.

सचिन बोरसे, संचालक, एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news