S Chockalingam Nashik SIR Review | थेट गृहभेटीद्वारे एस. चोकलिंगम् यांनी घेतली पुनरीक्षण माहिती

S Chockalingam Nashik SIR Review | थेट गृहभेटीद्वारे एस. चोकलिंगम् यांनी घेतली पुनरीक्षण माहिती; मतदारांची अचूक नोंद करून 'एसआयआर'ला गती देण्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचना
S Chockalingam Nashik SIR Review
S Chockalingam Nashik SIR Review
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाचे काम अधिक गतिमान, अचूक आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण व्हावे यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी तथा राज्याचे अपर मुख्य सचिव एस. चोकलिंगम् यांनी एसआयआर प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दिल्या.

S Chockalingam Nashik SIR Review
Female lawyer assault case | सुरक्षेबाबत बेजबाबदारपणा; पोलिस प्रशासनाला खडेबोल

त्यांनी शनिवारी (दि. १८) नाशिक शहरातील विविध विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांना भेट देऊन मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण अभियान अंमलबजावणीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतदान केंद्रांवरील सुविधा, बीएलओंचे कामकाज, गणनापत्रक भरण्याची प्रक्रिया, स्वयं-नोंदणी, उपक्रम तसेच ईएफ संगणकीकरणाच्या कामाची पाहणी केली.

तसेच प्रत्येक पात्र मतदाराची नोंद सुनिश्चित करण्यासाठी घराघरांत पोहोचून गणनापत्रके भरून घ्यावीत, स्वयं-नोंदणी प्रक्रियेला चालना द्यावी तसेच नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करावी, अशा सूचना दिल्या. व्यापक जनजागृती करीत नागरिकांनी गणनापत्रक भरून मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आडे, सहायक जिल्हाधिकारी कश्मिरा संख्ये, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई, नाशिक पूर्व मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी कुंदन हिरे, नाशिक मध्यच्या अर्पिता ठुबे, नाशिक पश्चिमच्या शुभांगी भारदे, नाशिकरोड - देवळालीच्या शर्मिला भोसले तसेच तहसीलदार राजेंद्र वाकचौरे, अपर तहसीलदार अमोल निकम, आबासाहेब तांबे, पंकज पवार उपस्थित होते.

S Chockalingam Nashik SIR Review
Morjim Lawyer Assault Case | आदेश अंमलबजावणीत हयगय; उच्च न्यायालयाकडून पोलिसांची कानउघाडणी

चारही मतदारसंघांचा आढावा

चोकलिंगम् यांनी नाशिक पूर्वमधील पार्कसाइड, बळी मंदिर या परिसरातील मोठ्या मतदारसंख्येच्या सोसायट्यांमध्ये पाहणी केली. त्याबरोबरच नाशिक पश्चिममध्ये उत्तमनगर भागातील मतदारांच्या घरी भेट देऊन ईएफ फॉर्म भरण्याची प्रक्रिया, स्वयं-नोंदणीची सुविधा आणि मतदारांनी करावयाच्या कारवाईची माहिती दिली.

नाशिकरोड - देवळालीतील गोवर्धन जिल्हा परिषद शाळेत बीएलओ व बीएलए यांच्याशी त्यांनी संवाद साधला. मतदारयादीतील समान छायाचित्र नोंदीची तातडीने पडताळणी करून आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. नाशिक मध्य मधील वडाळा गाव येथे प्रत्यक्ष मतदारांच्या घरी भेट देऊन गणनापत्रके भरून घेण्याच्या प्रक्रियेची पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news