

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भाविकांची सुरक्षा, गर्दी नियंत्रण, वाहतूक नियमन आणि प्रभावी संवाद व्यवस्था सक्षम करण्यासाठी सीसीटीव्ही सर्व्हेलन्स यंत्रणा आणि ऑप्टिकल फायबर केबल (ओएफसी) नेटवर्कचे व्यापक मूल्यांकन करण्यात येणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात सुमारे चार हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू असून, या यंत्रणेची कार्यक्षमता आणि नेटवर्क कनेक्टिव्हिटी तपासली जाणार आहे.
यासंदर्भात कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिका आयुक्त तसेच नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शनिवारी (दि. २१) बैठकीसाठी बोलाविले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, ओएफसी नेटवर्क आणि बॅकहॉल कनेक्टिव्हिटीची कामे हाती घेण्यात आली आहेत. कुंभमेळा प्राधिकरण, महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या या कामांचा तांत्रिक आढावा बैठकीत घेतला जाणार आहे.
यावेळी विद्यमान ओएफसी मार्ग, नेटवर्कची क्षमता, कनेक्टिव्हिटी, बॅकहॉल सुविधा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची ठिकाणे, त्यांची कार्यस्थिती आणि नियंत्रण कक्षांशी असलेली जोडणी तपासण्यात येणार आहे.
प्रमुख रस्ते, घाट, गर्दीची ठिकाणे, वाहतूक जंक्शन, पार्किंग क्षेत्रे आणि संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे तसेच नेटवर्क कनेक्टिव्हिटीची आवश्यकता निश्चित केली जाणार आहे. त्याचबरोबर अतिरिक्त बँडविड्थ, नेटवर्क उपकरणे आणि अन्य तांत्रिक सुविधांची गरजही पडताळली जाणार आहे.
कमांड अँड कंट्रोल यंत्रणेशी जोडणी
प्रस्तावित सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रणालीचे मॉनिटरिंग आणि कमांड अँड कंट्रोल यंत्रणेशी एकत्रीकरण करण्यावर बैठकीत भर दिला जाणार आहे. यासाठी ओएफसी रूट मॅप, नेटवर्क टोपोलॉजी, कॅमेऱ्यांची ठिकाणे आणि संबंधित पायाभूत सुविधांची माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्मार्ट सिटीच्या डेटा सेंटरमध्ये प्रायव्हेट ५जी, मॅनेज्ड वाय-फाय, पीटीटीएक्स, सीसीटीव्ही डेटा आणि अन्य आयटी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सर्व्हर रॅकची उपलब्धताही तपासली जाणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये ४ हजार CCTV कॅमेरे; सुरक्षेसाठी मोठी तयारी!
नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये CCTV कॅमेऱ्यांची तपासणी; कुंभमेळा आयुक्तांनी बोलावली महत्त्वाची बैठक
सिंहस्थ कुंभमेळ्यात गर्दीवर राहणार करडी नजर; हजारो CCTV कॅमेऱ्यांची यंत्रणा सज्ज होणार
कुंभमेळ्यासाठी सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची तयारी; नेटवर्क कनेक्टिव्हिटीचे होणार मूल्यांकन
घाट, रस्ते आणि गर्दीच्या ठिकाणी CCTV कॅमेरे; सिंहस्थासाठी प्रशासनाचा मोठा प्लॅन
सिंहस्थ कुंभमेळ्यात तंत्रज्ञानाची मदत; CCTV थेट कमांड अँड कंट्रोल सेंटरशी जोडणार
नाशिकच्या सिंहस्थासाठी OFC नेटवर्कची चाचणी; सुरक्षा यंत्रणेचा तांत्रिक आढावा
लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सतर्क; CCTV कॅमेऱ्यांसह 5G सुविधांचाही आढावा
सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी सुरक्षा यंत्रणेची तयारी; ४ हजार कॅमेऱ्यांच्या कामाची होणार तपासणी
Trimbakeshwar Kumbh