Nashik Simhastha Kumbh Mela 2027 | घाट, रस्ते, पूल अन् सार्वजनिक ठिकाणे झळाळणार

Nashik Simhastha Kumbh Mela 2027 | सिंहस्थ काळात प्रमुख घाट, रस्ते, पूल आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या स्ट्रीट लाइट व एलईडीच्या प्रकाशाने झळाळून निघणार आहेत.
Nashik Kumbh Mela 2027
Nashik Kumbh Mela 2027 Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ काळात प्रमुख घाट, रस्ते, पूल आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या स्ट्रीट लाइट व एलईडीच्या प्रकाशाने झळाळून निघणार आहेत. त्यासाठी कुंभ प्राधिकरणातर्फे स्वतंत्र समन्वय समितीची नियुक्ती करण्यात आली असून, प्रकाश योजनेसाठी ही समिती नियोजन करीत आहे.

Nashik Kumbh Mela 2027
Palase Somaiya Nagar Bridge | पळसे सोमय्यानगर पाटावरील पूल खचला

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर विद्युत सुशोभीकरण आणि प्रकाशयोजना कामांबाबत नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने योग्य ते नियोजन करण्यात येत आहे. कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी सिंहस्थाचे नुकतीच त्याबाबत बैठक घेऊन आढावाही घेतला आहे.

या बैठकीत कुंभमेळा प्राधिकरण अतिरिक्त आयुक्त सौरिश सहाय यांच्यासह सिंचन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक महानगरपालिका, त्र्यंबक नगर परिषद यांचे अधिकारी तसेच संबंधित संस्थांचे प्रतिनिधी आणि अनुभवी प्रकाशयोजना सल्लागार व अंमलबजावणी करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Nashik Kumbh Mela 2027
Nashik Zilla Parishad Budget 2026-27 | जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक 15 टक्क्यांनी घटणार

या प्रकाश योजनेसाठी समन्वित आणि प्रमाणित पद्धती विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामध्ये एकसंध डिझाइन, सौंदर्यात्मक सुसंगती तसेच कार्यात्मक व वास्तुशिल्पीय प्रकाशयोजनेचे वर्गीकरण करण्यात येणार आहे.

यासोबतच सुरक्षा मानके, आयपी रेटिंग, सर्ज प्रोटेक्शन, संरचनात्मक स्थैर्य, विविध सार्वजनिक क्षेत्रांसाठी आवश्यक लुमेन व लक्स पातळी, ग्लेअर नियंत्रण आणि ऊर्जा कार्यक्षमतेचे निकष यांवरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

त्यासोबतच केवळ कुंभमेळा पुरतेच नव्हे तर त्यानंतर अनेक वर्षे प्रकाशमय राहतील यासाठी सुरक्षित, टिकाऊ आणि दृश्यदृष्ट्या सुसंगत प्रकाशयोजना उभारण्यासाठी प्रारंभीच समन्वय आणि एकसंध तांत्रिक निकष निश्चित करण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news