

श्री चैतन्य टेक्नो स्कूल गुणवत्तापूर्ण आणि नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धतींसाठी नावाजली जाते. आयआयटी आणि जेईई फाउंडेशन प्रोग्राम शालेय वयापासूनच येथे शिकवला जातो. दरवर्षी ‘नीट’ आणि ‘जेईई’ परीक्षांमध्ये अव्वल रँक तयार करण्याच्या यशस्वी विक्रमासह एक मजबूत शैक्षणिक पाया तयार करणे, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रात भविष्यातील यशस्वी नेतृत्व घडवणे हेच संस्थेचे उद्दिष्ट आहे.
चैतन्य टेक्नो स्कूलमधील आयआयटी आणि जेईई फाउंडेशन शिक्षणक्रमासह विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षांच्या मूलभूत गोष्टींची ओळख करून देण्यासाठी डिझाइन केले आहेत. इयत्ता सहावीपासूनच, विद्यार्थी अभ्यासक्रमात व्यग्र राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे विश्लेषणात्मक तसेच तार्किक बुद्धिमत्ता आणि त्यांची समस्या सोडवण्याची कौशल्ये विकसित होत जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या प्रकारे आत्मविश्वास तयार होतो. परिणामी, उच्च ग्रेड आणि अभ्यासाच्या अधिक प्रगत स्तरांवर त्यांची प्रगती होत जाते.
फाउंडेशनमध्ये आयआयटी जेईई आणि नीटसारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी आवश्यक ती तयार करून घेतली जाते. ज्यामध्ये गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगत संकल्पनांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक संकल्पनाच समजत नाहीत तर त्यांची उपयोजकता, उपयुक्तता वास्तविक परिस्थितींमध्ये कशी वापरावी हे डोळ्यांसमोर ठेवण्यात आले आहे. शाळेतील शिक्षण कार्यक्रम चार भिंतींच्या आतील शिक्षणाला व्यावहारिक उपयुक्ततेसह एकत्रित केला जातो. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे, फिल्ड ओळखण्यासाठी शाळेत नियमित मूल्यांकन, प्रश्नमंजूषा आणि मॉक चाचण्या घेतल्या जातात.
तज्ज्ञ प्राध्यापक आणि वैयक्तिक मार्गदर्शन : श्री चैतन्य टेक्नो स्कूलमध्ये उच्चशिक्षित पात्र आणि अनुभवी शिक्षकांची टीम विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी मेहनत घेत असते. येथील शिक्षक नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा वापर करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासह, त्यांच्यातील अभिनव सामर्थ्य आणि कच्चे दुवे यांकडे जातीने लक्ष दिले जाते. येथील शिक्षक विद्यार्थ्यांना परीक्षा धोरण, वेळ व्यवस्थापन आणि तणाव नियोजन करण्याच्या तंत्रांवर मार्गदर्शन देतात, ज्यामुळे विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी सज्ज होतात.
विद्यार्थ्यांना आदर्श शिक्षण वातावरण देण्यासाठी शाळेमध्ये आधुनिक वर्गखोल्या, सुसज्ज प्रयोगशाळा आणि सर्वसमावेशक ग्रंथालय अशा अत्याधुनिक पायाभूत सुविधा आहेत. शिकवण्याच्या पद्धतींमध्ये तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण, स्मार्ट बोर्ड आणि डिजिटल संसाधनांचा वापर केला जातो.
श्री चैतन्य टेक्नो स्कूल ही एक प्रमुख शैक्षणिक संस्था आहे, जी नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धती आणि प्रगत तंत्रज्ञानाद्वारे उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी समर्पित आहे. सर्वांगीण विकास आणि जागतिक दृष्टिकोनांवर लक्ष केंद्रित करून, विद्यार्थ्यांना त्यांच्या पूर्ण क्षमता साध्य करण्यासाठी आणि जगावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी सक्षम करणे हेच संस्थेचे उद्दिष्ट आहे.
श्री चैतन्य टेक्नो स्कूलमध्ये अभिनव, सर्जनशील बुद्धिमान आणि यशस्वी नेतृत्व घडवले जातात. यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रित करतो. येथील आयआयटी आणि जेईई फाउंडेशन कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी मजबूत शैक्षणिक पाया तयार करण्याची आणि स्पर्धात्मक परीक्षांमध्ये आणि त्या पुढील यशाच्या मार्गावर स्वतःला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी आहे. संस्थेचा आयआयटी आणि जेईई फाउंडेशन कार्यक्रम आणि प्रवेशांबद्दल अधिक माहितीसाठी, वेबसाइटवर लॉगीन करा.
श्री चैतन्य टेक्नो स्कूलची नीट आणि जेईई परीक्षांमध्ये अव्वल क्रमांक मिळवण्याची अभिमानास्पद परंपरा आहे. येथील विद्यार्थ्यांनी देशभरातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळवला आहे आणि हा यशोप्रवास आजही अव्याहत सुरू आहे. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचे यश आजवरील यश फाउंडेशन प्रोग्रामच्या परिणामकारकतेचा आणि आमच्या प्राध्यापकांच्या समर्पणाची साक्ष देतात.